लष्कराचा कुत्रा “Zoom”! अतिरेक्यांना ओळखलं, त्यांच्यावर हल्ला करायला गेला…लष्कराकडून व्हिडीओ शेअर, Zoom चे कारनामे माहित आहेत का?

दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली.

लष्कराचा कुत्रा Zoom! अतिरेक्यांना ओळखलं, त्यांच्यावर हल्ला करायला गेला...लष्कराकडून व्हिडीओ शेअर, Zoom चे कारनामे माहित आहेत का?
Army dog Zoom
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 11:01 AM

कुत्रा हा प्रचंड प्रामाणिक प्राणी! माणूस एकवेळ कुत्र्यावर विश्वास ठेवेल पण तो माणसावर विश्वास ठेवणार नाही. लष्करातील “झूम” कुत्र्याबद्दल ऐकलंय का? हा कुत्रा प्रचंड चर्चेत आहे. कारण काय? त्याची शूरता, त्याचा प्रामाणिक पणा! झालं असं की जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा शूर कुत्रा ‘झूम’ गंभीर जखमी झाला. झूम ने अतिरेक्यांना ओळखलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताना झूम ला दोन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, तर अनेक सैनिकही जखमी झालेत.

दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. लष्कराने काल,सोमवारी झूम नावाचा आपला प्रशिक्षित कुत्रा शोध मोहिमेसाठी एका घरात पाठवला होता.

कारवाई दरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये.

झूमने अतिरेक्यांची ओळख पटवून त्यांच्यावर हल्ला केला. हे सगळं घडत असताना कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लष्कराने केलेल्या अनेक कारवायांमध्ये अतिरेक्यांशी लढणाऱ्या ‘झूम’चा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. या क्लिपमध्ये लष्कराने झूमला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

झूम हा एक प्रशिक्षित कुत्रा आहे. अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आलंय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झूम दक्षिण काश्मीरमधील अनेक सक्रिय कारवायांचा भाग आहे.

काल, सोमवारी एका घरात अतिरेकी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. ते घर रिकामं करायची जबाबदारी झूम वर होती. झूम आपली जबाबदारी पार पाडायला गेला आणि दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

गंभीर जखमी होऊनही शूर सैनिक झूमने आपले काम सुरूच ठेवले. त्याने दोन दहशतवादी ठार झाले. झूमला श्रीनगरमधील लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. आता “झूम” वर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये.