AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mayor Marriage : म्हातारचळाचा मेयरसाहेबांना फटका! 65 व्या वर्षी थाटले 16 वर्षीय मुलीशी लग्न, मग झाले असे काही की…

Mayor Marriage : जगात केव्हा काहीही घडू शकते. ते आपल्या बुद्धीच्या पल्याड, अतर्क असते, अविश्वसनीय असते. आता हेच पाहा ना, या महापौरांनी 65 व्या वर्षी 16 वर्षीय मुलीशी लग्नगाठ बांधली, पण हे करताना त्यांनी केलेला प्रताप त्यांच्या चांगलाच अंगलट आला..

Mayor Marriage : म्हातारचळाचा मेयरसाहेबांना फटका! 65 व्या वर्षी थाटले 16 वर्षीय मुलीशी लग्न, मग झाले असे काही की...
| Updated on: May 05, 2023 | 7:20 PM
Share

नवी दिल्ली : जगात केव्हा काहीही घडू शकते. ते आपल्या बुद्धीच्या पल्याड, अतर्क असते, अविश्वसनीय असते. आता हेच पाहा ना, या महापौरांनी (Mayor) 65 व्या वर्षी 16 वर्षीय मुलीशी लग्नगाठ बांधली. नातीच्या वयाच्या शाळकरी मुलीशी त्यांनी विवाह केला. हायस्कूलच्या या विद्यार्थिनीने (High School Student) सौंदर्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता. तिच्या सौदर्यावर महापौर फिदा झाले. सोळावं वरीस धोक्याचं म्हटले जाते. ही विद्यार्थिनी 16 वर्षाची झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा विवाह उरकण्यात आला. पण या प्रकरणात तर अजून धक्के बसणे बाकी आहे, कारण तुम्हाला महापौरांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत अनेक अतर्क्य गोष्टी घडवून आणल्या आणि ते टिकेचे धनी ठरले. त्यानंतर त्यांना मोठा फटका बसला.

कुठे घडली घटना ब्राझीलमधील पराना राज्याच्या अरौकारियाचे महापौर हिसम हुसैन देहैनी हे सध्या आयुष्याची दुसरी इनिंग, पारी खेळत आहे. पण त्यांचा उत्साह दांडगा आहे. त्यांनी 65 व्या वर्षी 16 वर्षीय मुलीशी लग्नगाठ बांधली. त्यांच्यापेक्षा ही तरुणी जवळपास 50 वर्षांनी लहान आहे. या तरुणीचे नाव कौएनी रोड कॅमार्गो आहे. ती मिस अरौकिया या सौदर्य स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आली. त्यानंतर लागलीच हा विवाह उरकण्यात आला.

अनेक गोष्टी आल्या बाहेर हा विवाह एक डील असल्याची चर्चा तिथे रंगली आहे. कारण महापौरांनी लग्नानंतर त्यांच्या सासूला थेट संस्कृती आणि पर्यटन सचिव पदाची लॉटरी लावली. या सासूबाईच्या बहिणीला नोकरीत बढती तर दिलीच पण सासूला 1500 डॉलरची पगारात घसघशीत वाढ दिली. 15 एप्रिल रोजी महापौरांनी विवाह केला होता. देहैनी हे ब्राझीलमधील करोडपती आहे. त्यांच्याकडे जवळपास 22 कोटींची संपत्ती आहे.

असा बसला फटका ते दुसऱ्यांदा महापौर झाले होते. या लग्नामुळे त्यांना सिडाडानिया पॉलिटिकल पार्टीचा राजीनामा द्यावा लागला. एवढंच नाही तर त्यांनी पदाच्या जोरावर ज्यांना नोकरीवर ठेवले, त्यांनाही नोकरीवरुन कमी करण्यात आले. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास पण करण्यात येत आहे. आता त्यांच्या महापौर पदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

अनेक प्रताप नावावर देहैनी यांच्या नावावर अनेक प्रताप नोंदलेले आहे. त्याचे हे सातवे लग्न आहे. त्यांना एकूण 16 अपत्य झाली आहेत. 2000 साली ते एका ड्रग्ज तस्करीप्रकरणात अटक ही झाले होते. ब्राझीलसह पाच देशांमध्ये मुलगी 16 वर्षांची झाल्यावर तिच्या आई-वडिलांच्या मर्जीने लग्न करु शकते. त्यांची ही पत्नी सध्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तसेच लग्नाचा दिवस सर्वात आनंददायी असल्याचा सोशल मीडियावर दाव करत आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.