AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कारमध्ये मांजर अडकली, शर्थीच्या प्रयत्नानंतर शेवटी जीव वाचवला, औरंगाबादकरांवर कौतुकाचा वर्षाव

व्हायरल होत असलेला व्हिडीओ औरंगाबाद शहरातील सातार परिसरातील आहे. येथे नागेश पांडे यांचे घर आहे. घरासमोर ते कार पार्क करतात. काही कामानिमित्त आज ते कार घेऊन बाहेर जात होते. मात्र त्यांच्या कारमधून अचानकपणे मांजर ओरडण्याचा आवाज येत होता. शोधाशोध केल्यानंतरदेखील मांजर नेमकी कोठे आहे, हे समजत नव्हते.

Video | कारमध्ये मांजर अडकली, शर्थीच्या प्रयत्नानंतर शेवटी जीव वाचवला, औरंगाबादकरांवर कौतुकाचा वर्षाव
AURANGABAD CAT VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 10:59 PM
Share

औरंगाबाद : काही लोकांना मांजर, कुत्रा असे प्राणी पाळायला आवडतं. काही लोक तर प्राणी आणि पक्षीमित्र म्हणून काम करत असतात. मात्र कधीकधी हादरवून सोडणाऱ्या घटना आपल्या कानी पडतात. आपल्या स्वार्थापोटी तसेच रागाच्या भरात लोक प्राण्यांना मारून टाकतात. सध्या मात्र एक अतिशय वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मांजरीचा जीव वाचवण्यासाठी औरंगाबादकरांनी मोठी मेहनत घेतली आहे. शहरातील सातारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या एका मांजरीची सुटका केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

अचानकपणे मांजर ओरडण्याचा आला आवाज

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील आहे. येथे नागेश पांडे यांचे घर आहे. घरासमोर ते कार पार्क करतात. काही कामानिमित्त आज ते कार घेऊन बाहेर जात होते. मात्र त्यांच्या कारमधून अचानकपणे मांजर ओरडण्याचा आवाज येत होता. शोधाशोध केल्यानंतरदेखील मांजर नेमकी कोठे आहे, हे समजत नव्हते. शेवटी ती कारच्या समोरच्या भागात अडकून बसल्याचे पांडे यांच्या निदर्शनास आले.

छोट्या मुलाच्या मदतीने मांजरीला बाहेर काढण्यात आले

त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या मांजरीची सुटका करण्यासाठी कॉलिनीतील लोकांनी खूप प्रयत्न केले. मांजर  कारमध्ये अतिशय आत जाऊन बसल्यामुळे तीला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. शेवटी साहील पांडे या छोट्या मुलाच्या मदतीने मांजरीला बाहेर काढण्यात आले. तसेच तिला बाहेर सोडून देण्यात आले. मांजरीचा जीव वाचावा म्हणून रात्रीच्या अंधारात प्रभाकर सोळुंके यांनीदेखील पांडे यांना मदत केली.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तसेच प्राण्यांची हत्या करु नये, असे आवाहन केले जात आहे.

इतर बातम्या :

Video: ट्रेन विकत घ्यायचीय, 300 कोटींचं कर्ज हवंय, सतत फोन करुन त्रास देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची ग्राहकाकडून फिरकी!

Video: आकाश भेदणाऱ्या गरुडाला कधी पोहताना पाहिलंय? गरुडाची आणखी एक कला दाखवणारा व्हिडीओ

Video | टी-20 सामन्यात पाकिस्तानने भारताला नमवलं, बीडमध्ये क्रिकेटप्रेमींनी टीव्ही फोडला, व्हिडीओ व्हायरल

(aurangabad people rescued cat who stuck into car video went viral on social media)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?