Video: ट्रेन विकत घ्यायचीय, 300 कोटींचं कर्ज हवंय, सतत फोन करुन त्रास देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची ग्राहकाकडून फिरकी!

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती बँकेतून फोन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची फिरकी घेत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसाल.

Video: ट्रेन विकत घ्यायचीय, 300 कोटींचं कर्ज हवंय, सतत फोन करुन त्रास देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची ग्राहकाकडून फिरकी!
बँक कर्मचाऱ्याची ग्राहकाकडून फिरकी

बँका दररोज त्यांच्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी अनेक कॉल करतात. या कॉलमुळे ग्राहकांना अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो. माणूस कुठे आहे, कुठल्या कामात आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, याचं बँकांना काही देणं-घेणं नसतं. त्यांना फक्त आपली वस्तू म्हणजेच क्रेडीट कार्ड वा लोन खपवायचं असतं. मात्र, बऱ्याचदा काही ग्राहकही या फोन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची फिरकी घेताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती बँकेतून फोन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची फिरकी घेत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसाल. (Man asks loan of 300 crores from the bank to buy the train video goes viral on social media)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्तीला बँकेचा फोन येतो, बँक कर्मचारी कर्जाविषयी विचारणा करते. त्यावर हा ग्राहक कर्ज हवं असल्याचं सांगतो. त्यावर ती व्यक्ती विचारते कशासाठी कर्ज हवं आहे. यावर ग्राहक या बँक कर्मचारी महिलेची फिरकी घेतो आणि म्हणतो, मला ट्रेन विकत घ्यायची आहे, त्यासाठी कर्ज हवं आहे. एवढं ऐकल्यानंतर बँक कर्मचारी महिलेला कळायलं हवं की हा ग्राहक तिची फिरकी घेत नाही. पण तिला कळत नाही. ती पुढचा प्रश्न विचारते की, किती रुपयांचं कर्ज हवं आहे. यावर ग्राहक सांगतो, फक्त 300 कोटी रुपये. यावरही ही महिला थांबत नाही आणि पुढचा प्रश्न विचारते की, आधी कुठलं कर्ज आणि त्याचा ईएमआय सुरु आहे. त्यावर ग्राहक सांगतो, आधी एक सायकल घेतली होती, त्यासाठी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय सुरु आहे.

पाहा व्हिडीओ:

हा मजेदार व्हिडिओ onGoldenthrust नावाच्या अकाऊंटवरुन ट्विटरवर शेअर केला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 2.3 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत.

सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ लोकांना खूप आवडतो. हेच कारण आहे की अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपल्या कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले, ‘हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘आपण कुणालाही अशाप्रकारे त्रास देणं चांगलं नाही.’ या व्यतिरिक्त, अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: Paytm च्या मालकाचा कर्मचाऱ्यांसोबत भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, बॉस असावा तर असा!

Video | टी-20 सामन्यात पाकिस्तानने भारताला नमवलं, बीडमध्ये क्रिकेटप्रेमींनी टीव्ही फोडला, व्हिडीओ व्हायरल

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI