Video: Paytm च्या मालकाचा कर्मचाऱ्यांसोबत भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, बॉस असावा तर असा!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये Paytmचे सीईओ विजय शेखर शर्मा हे कर्मचार्‍यांसोबत 'लावारीस' चित्रपटातील 'अपनी तो जैसे तैसे' या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

Video: Paytm च्या मालकाचा कर्मचाऱ्यांसोबत भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, बॉस असावा तर असा!
Paytm CEO विजय शेखर यांचा कर्मचाऱ्यांसोबत डान्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेले फोटो, व्हिडिओ रोज लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतात. अलीकडच्या काही दिवसांत, त्याने पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या कर्मचाऱ्यांसोबत नाचताना दिसत आहे. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma dances on apni toh jaise taise with his employees video goes viral)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये Paytmचे सीईओ विजय शेखर शर्मा हे कर्मचार्‍यांसोबत ‘लावारीस’ चित्रपटातील ‘अपनी तो जैसे तैसे’ या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी लिहिले, ‘भारतातील सर्वात मोठ्या IPOपैकी एक सेबीच्या मंजुरीनंतर Paytm कार्यालयात सेलिब्रेशनचा सीन आहे.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी स्वतःच्या प्रतिक्रियाही देण्यास सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ:

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘विजय शेखर शर्मा खूप मस्त बॉस आहेत.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘भाई व्वा! बॉस हो तो ऐसा. याशिवाय इतर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर ज्या प्रकारे शेअर केला आहे ते पाहून असे वाटते की हा व्हिडिओ सेबीच्या वतीने PAYTM कडून IPO च्या मंजुरीनंतर बनवण्यात आला आहे, परंतु सत्य हे आहे की हा व्हिडिओ 2018 चा आहे. म्हणजे हा व्हिडीओ आताचा नाही तर जुना आहे.

हेही पाहा:

Video: “मणिके मगे हीते”चं काश्मिरी व्हर्जन व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Video: वराला आणण्यासाठी वधूने घेतलं कारचं स्टेअरिंग हाती, वधूच्या स्वॅगवर नेटकरी घायाळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI