
सोशल मीडियावर एक असं माध्यम आहे, ज्या माध्यामातून आपण अनेक विषय मांडू शकतो… आता देखील सोशल मीडियावर एका परदेशी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो परदेशातून आला आणि थेट मुंबईच्या मोठ्या झोपडपट्टीत पोहोचला. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईच्या झोपडपट्टीत तो तीन दिवस राहिला. सांगायचं झालं तर, भारतातील गरिबी ही येथील नागरिकांसाठी आणि सरकारांसाठी चिंतेची बाब आहे पण इतर देशांतील लोकांसाठी ती मनोरंजनाची बाब आहे… हे आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून दिसत आहे.
जेव्हा एका परदेशी युट्यूबरने भारताला भेट दिली तेव्हा त्याने देशाचं सौंदर्य दाखवले नाही, तर त्याऐवजी मुंबईतील धारावी या झोपडपट्टीत जाऊन स्वतःला आव्हान दिले. यामुळे लोक संतापले. भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात कुप्रसिद्ध झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली धारावी झोपडपट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी, याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर पीट झेड या नावाने ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियन कंटेंट क्रिएटर.
पीट झेड याने नुकताच इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की, ‘भारतातील सर्वात भयानक झोपडपट्टी’ मध्ये तीन दिवस काढले… पण त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे… लोकांनी त्यावर तीव्र टीका केली आणि त्याला Poverty Tourism असं नाव दिलं.
सांगयाचं झालं तर, धारावी हा जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी क्षेत्रांपैकी एक आहे, जिथे दहा लाखांहून अधिक लोक अरुंद रस्त्यांमध्ये आणि लहान घरांमध्ये राहतात. 2008 च्या ऑस्कर विजेत्या “स्लमडॉग मिलियनेअर” सिनेमानंतर धारावीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली, परंतु आता प्रश्न परदेशी कंटेंट निर्माते या भागाचा वापर केवळ खळबळजनक कंटेंट तयार करण्यासाठी आणि व्ह्यूज मिळविण्यासाठी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पीट झेडचा इंस्टाग्राम व्हिडिओ एका महिलेच्या चोरीच्या घटनेने सुरु होता, त्यानंतर तो त्याच्या भारतीय मैत्रिणी आयुषीसोबत धारावीच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो. कॅमेऱ्यात पीट झेड म्हणतो, ‘आम्ही इथे तीन दिवस राहणार आहोत. बघा हे रस्ते किती अरुंद आहेत.’ सध्या परदेशी नागरिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांना संताप व्यक्त केला आहे.