Baba Vanga Prediction : भारत-पाक युद्ध, बाबा वेंगाची ती भविष्यवाणी; शहबाज शरीफ यांची धडधड वाढली

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाने 2025 मधील युद्धाविषयी भविष्यवाणी केली आहे. भारतात दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या पाकड्यांना यावेळी कायमचा धडा शिकवण्याची मागणी होत आहे. त्यातच वेंगाच्या भविष्यवाणीची पाकिस्तानमध्ये पण चर्चा सुरू आहे.

Baba Vanga Prediction : भारत-पाक युद्ध, बाबा वेंगाची ती भविष्यवाणी; शहबाज शरीफ यांची धडधड वाढली
पाकिस्तान धाकी पडला
Image Credit source: गुगल
| Updated on: May 04, 2025 | 4:22 PM

भारत-पाकिस्तान या दोन देशात युद्धाचे ढग जमा झाले आहेत. दोन्ही देशात जर युद्ध झाले तर काय विनाश होईल, याची कल्पना करणे अवघड आहे. पाकिस्तानची कहाणी समाप्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. 2025 मधील या यु्ध्दाविषयी बाबा वेंगाने अगोदरच भविष्यवाणी केली आहे. सध्या सीमेवर युद्धाचे काळे ढग जमा झाले आहे. पाकिस्तानने तर अगोदरच तयारी केली आहे. सीमेजवळ युद्ध सराव सुरू आहे. रणगाडे दाखल झाले आहेत. पाकिस्तानी नेत्यांना कापरे भरले आहे. तर मौलानांना युद्ध ज्वर चढला आहे. पाकिस्तानच्या विनाशाची कहाणी लिहिल्या जात आहे. भारताच्या तीनही सैन्य दलाचे जवान प्रहार करण्यासाठी तयार आहे. राफेल आणि सुखोई तयार आहे. ब्रम्होस पण तयार आहे. केवळ तारीख आणि वेळेचे गणित काय आहे ते गुलदस्त्यात आहे.

दहशतवादी आणि लष्कराला थेट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर बिहार येथील सभेत आणि काल अंगोलाचे राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादी, त्यांचे आश्रयदाते यांना करारा जबाब देण्यात येईल हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. त्यामुळे भारत यावेळी मोठे पाऊल टाकणार असल्याचे सांगितले जात आहे. पहलगाम हल्ल्याला आता 12 दिवस लोटले आहेत. भारतीय सैन्य अधिकारी आणि दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. पाकिस्तानची आर्थिक आणि इतर दमकोंडी सुरू झाली आहे. आता केवळ प्रहार तितका बाकी आहे.

काय आहे ती भविष्यवाणी

बाबा वेंगाने 2025 मध्ये आणि त्यापूर्वीच जगातील काही भागात युद्धाला तोंड फुटणार असल्याची भविष्यवाणी केली होती. जगात रशिया आणि युक्रेन, हमास आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. तात्पुरता शांतता करार होतो आणि पुन्हा युद्ध सुरू होते. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाकिस्तानने दहशतवादी पाठवून जी घोडचूक केली आहे, त्यामुळे दोन्ही देशातील वातावरण तापले आहे.

भारत आणि पाकिस्तान या देशात युद्ध होईल असे बाबा वेंगाने थेट भाष्य केलेले नाही. पण तिने मनुष्य पतन आणि युद्ध होईल असे म्हटले आहे. त्यावरून ही भविष्यवाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. सध्या भारताने अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे. पण भारताने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे आणि त्यांच्या पाठिराख्यांना सुद्धा धडा शिकवणार असल्याचे ठणकावले आहे. त्यामुळे पाकिस्तान गर्भगळीत झाला आहे.

डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.