Baba Vanga Prediction : शुक्र बघ राज्य करी! ग्रहावर नवीन इंधनाचा साठा, काय सांगून गेली बाबा वेंगा
Baba Vanga Prediction Venus : शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी, मंगेश पाडगावकरांच्या या कवितेने मराठी मनाचा ठाव घेतला आहे. आता हा शुक्र भविष्यातील मानवी मोहिमांसाठी मोठी भूमिका बजावणार आहे, बाबा वेंगाचे ते भाकीत तुम्हाला माहिती आहे का?

शुक्राने चंद्राच्या खालोखाल प्रियकर-प्रेयसीला रिझवले आहे. अनेक कवींच्या कवितेत चंद्रा इतकेच शुक्राला पण स्थान माहात्म्य आहे. मंगेश पाडगावकरांच्या, शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी या कवितेची शीतलता मराठी जणाने अनुभवली आहे. तर दुसरीकडे भा. रा. तांब्यांनी ‘घनी तमीं शुक्र बघ राज्य करी’ अशा अवघड वळणावरून मानवी मनाचा ठाव घेतला आहे. पण गुरू प्रमाणेच तुमचा शुक्र जर प्रबळ असेल तर अनेक संकटं लिलाया पार होतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. आता हे सर्व उगळण्यामागे भविष्यवेत्ती बाबा वेंगांची ती भविष्यवाणी आहे, जी खरी होऊ पाहत आहे. अवकाशातील मोहिमांमध्ये मानव जातीला शुक्राचा मोठा हातभार लागणार आहे. शुक्र ग्रहावरचा तो नवीन इंधनाचा साठा मानवाला खुणावतोय, खरंच बाबा वेंगाची ते भाकीत खरं ठरणार का?
बाबा वेंगाचं भाकीत काय?
बुल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगा ही जन्मतःच अंध होती. पण तिला मिळालेल्या अलौकिक शक्तीने तिने भविष्यातील अनेक घटनांची माहिती जगाला दिली. तिच्या शिष्यांनी तिचे हे गूढ काव्य जतन केले. तिच्या दाव्यानुसार, शुक्र हा मंगळ ग्रहासारखाच मानव्याच्या भविष्यासाठी खास असेल.
मानव मंगळावर वसाहत वसवू पाहत आहे. तर दूर दुसऱ्या प्रकाशवर्षातील काही ग्रहावर मानवी वस्ती असल्याचा त्याचा दावा आहे. त्यासाठी मानवाला दूरच्या शोध मोहिमा आखाव्या लागतील. त्याला अंतराळात भराऱ्या माराव्या लागतील. सध्याचे पेट्रोल, डिझेल, हायड्रोजन, सौरऊर्जा वा इतर ऊर्जा स्त्रोत त्यासाठी तोकडे आहेत. पण शुक्र ग्रहावर एक नवीन ऊर्जा स्त्रोत आहे. हा इंधनाचा साठा मानवाला ताब्यात घ्यायचा आहे. त्याचा वापर पर्यावरणाला हानी न पोहचता नेमका कसा करायचा यावर संशोधन सुरू आहे.
कशासाठी मोहीम?
बाबा वेंगाच्या मते मानव 2028 पर्यंत नवीन ऊर्जा स्त्रोतांच्या शोधासाठी शुक्र ग्रहावर अंतराळ मोहिमांची सुरूवात करेल. सध्या NASA, ESA किंवा इतर कोणत्याही अंतराळ संस्थांनी २०२८ मध्ये शुक्र ग्रहासाठी कोणतीही अधिकृत मोहिम जाहीर केलेली नाही, तरीही शुक्र ग्रहावरील वैज्ञानिक रस काही अंशी वाढला आहे. NASA च्या DAVINCI+ आणि VERITAS, तसेच ESA ची EnVision या मोहिमा 2030 च्या आसपास होतील. म्हणजे भाकीत आणि मोहिमांमध्ये अवघे दोन वर्षांचे अंतर आहे.
शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याचे निदर्शनास आले आहे, ज्याला संभाव्य जैविक इंधन मानले जाते. फॉस्फीन वायू (Phosphine gas) म्हणजे PH₃ हे रासायनिक सूत्र असलेला एक रंगहीन, ज्वलनशील आणि विषारी वायू आहे. पण तो ऊर्जेचा नवीन स्त्रोत म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे अनंतकाळासाठी ऊर्जेची तरतूद होण्याची शक्यता आहे.
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
