Baba Vanga Prediction : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने फुटला घाम, जगावर विचित्र महामारीचे हे कोणते संकट?
Baba Vanga Prediction : पुन्हा एक महामारी मानव जातीला हदरवणार असे भाष्य बाबा वेंगाने केले आहे. कोरोना पेक्षा पण हा रोग भयंकर असेल. त्यामुळे लोक लवकर म्हातारे होतील, काय आहे तिचे भयावह भाकीत?

Baba Vanga Scary Prediction : बाबा वेंगाची अजून एक भयावह भविष्यवाणी अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवत आहे. बाबा वेंगाची यापूर्वीची भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता तिने जगाला अजून एका महामारीचा इशारा दिला आहे. बल्गेरियाच्या बाबा वेंगाचा मृत्यू झाल्यानंतरही तिची भाकीतं चर्चेत आहेत. ती खरी ठरल्याचा दावा पण करण्यात येतो. आता तिची आणखी एक भविष्यवाणी व्हायरल होत आहे. त्यात तिने एका विचित्र महामारीचा उल्लेख केला आहे. या भाकितानुसार, काही वर्षांनी मानव जातीवर हे संकट येणार आहे. हा व्हायरस कोरोना पेक्षा घातक असेल. यामध्ये मानव झपाट्याने वृद्ध होईल. तरुण पटापट म्हातारे होतील. काय आहे बाबा वेंगाची ती भविष्यवाणी…
कोण आहे बाबा वेंगा
बाबा वेंगा ही तिच्या भविष्यवाणीसाठी ओळखली जाते. तिची भाकीतं अत्यंत भयावह आहेत. बाबा वेंगा हिचा जन्म 1911 साली झाला होता. तर 1996 मध्ये वयाच्या 86 वर्षी तिचा मृत्यू झाला. 12 वर्षांची असताना एका अपघातामुळे तिला आंधळेपण आले होते. त्यानंतर तिला भविष्यातील घटनांचा आभास होऊ लागला. त्याविषयी ती सांगू लागली. या घटना ती काव्यात सांगत होती. तिची भाकीत तिचे शिष्य टिपून घेत असत. 9/11 हल्ला, त्सुनामी, डायनाचा मृत्यू आणि इतर अनेक घटनांची भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो.
तरुण होतील लवकर म्हातारे
बाबा वेंगा हिच्या मते 2084 मध्ये अनेक नैसर्गिक बदल होतील. निसर्गातील हे बदल मानव जातीसाठी घातक ठरतील. 2088 मध्ये एक व्हायरस येईल. त्यामुळे लोक झटपट म्हातारे होतील. तरुणांना कमी वयातच अनेक रोग होतील. 2097 पर्यंत या आजारामुळे जगातील अनेक लोक म्हातारे होतील. नंतर अचानक हा रोग गायब होईल.
हिंदू धार्मिक ग्रंथांप्रमाणे, विष्णू पुराणानुसार, कलियुगात मानवाचे आयुष्य कमी होईल. मानवाचे आयुष्य आदमासे 20 वर्षे असेल. कमी वयातच मुलांचे केस पांढरे होतील. त्यांचे कमी वयातच लग्न होईल. मुलं 9-10 वर्षांचे असताना आणि मुली 6-7 वर्षाची असतानाच त्यांचे लग्न होतील आणि त्यांना अपत्य प्राप्ती होईल.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. शास्त्रज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी रिओच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तिच्या पुस्तकात ही माहिती वर्तवण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.
