पोटातले ओठांवर, बागेश्वर बाबा चढणार बोहल्यावर, दोनाचे करणार चार हात, भावी वधू तरी कोण? लाजत लाजत केला मोठा खुलासा?
Bageshwar Baba Marriage Plan : बागेश्वर धामचे महंत, पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे दोनाचे चार हात कधी होतात, याची गेल्या वर्षभरापासून चर्चा रंगली आहे. काही कथा वाचकांशी त्यांचे लग्न जुळल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला होता. आता त्यांनी एक खास गोष्ट सांगितली आहे.

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या बिहार दौर्यावर आहेत. गोपालगंज येथे पाच दिवसांच्या हनुमान कथेच्या धार्मिक कार्यक्रमात त्यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले. हिंदू राष्ट्रासाठी राज्य घटनेत सुधारणेची मागणी त्यांनी येथे केली होती. दरम्यान या कथा कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांनी माध्यमांशी त्यांच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला. बागेश्वर बाबांनी सांगितले की ते लवकरच लग्न करणार आहेत. ते लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पण त्यांचा जोडीदार कोण असेल याविषयीचे गूढ त्यांनी कायम ठेवले.
काही नियमांमुळे लोकांची भेट नाही
पंडित धीरेंद्र शास्त्री गेल्या पाच दिवसांपासून गोपालगंज येथे आहे. ते हनुमान कथा आणि निरूपणासाठी येथे आले होते. त्यांना अनेक लोकांच्या भेटी घ्यायच्या होत्या. खासकरून गरीब लोकांची आस्थेने विचारपूस करायची होती. पण प्रशासनाच्या सूचनांमुळे आपण कथा वाचनानंतर एकांत पसंत केल्याचे ते म्हणाले. प्रशासनाच्या सूचनांचे आपण पालन केल्याचे ते म्हणाले. या लोकांसाठी खास हा बिहारमधील कथा वाचनासाठी आल्याचे ते म्हणाले.




त्यांनी या सत्संगाला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती दिली. बालाजी महाराज आणि सन्यासी बाबाच्या आशीर्वादाने हे सर्व घडत असल्याचे ते म्हणाले. श्रद्धेमुळे लोक या धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी लाईव्ह प्रसारणातूनही लाखो लोकांनी कथाअमृत घेतल्याचे म्हटले.
काही लोकांच्या पोटात दुखते
या कथा कार्यक्रमावर काही लोकांनी टिप्पणी आणि टीका केली. त्यावरही बागेश्वर बाबांनी प्रतिक्रिया दिली. हनुमान कथेमुळे काही लोकांच्या पोटात दुखते, हे काही नवीन नाही. ही दूषणं देण्याची परंपरा पण जुनीच असल्याचा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला. ऋषी मुनी जेव्हा यज्ञ करत, त्यावेळी सुद्धा राक्षस विध्वंस करत होते, याची त्यांनी आठवण करून दिली. ते दरभंगा आणि कुशीनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. आता ते कुणाशी लग्न करणार या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठल्या होत्या.