AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॉरेनची पाटलीन! बेल्जियमची मुलगी रिक्षा चालकाच्या प्रेमात वेडी, लग्न करायला भारतात

त्यांची आधी मैत्री झाली आणि मग हळूहळू ती मैत्री फुलू लागली.

फॉरेनची पाटलीन! बेल्जियमची मुलगी रिक्षा चालकाच्या प्रेमात वेडी, लग्न करायला भारतात
belgium girl marries with indian guyImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Nov 27, 2022 | 3:40 PM
Share

भारतातली मुलं सर्रास परदेशी मुलींशी लग्न करतात. असंही प्रेमाला कुठे कसली बंधनं असतात नाही का? देश, भाषा, जात पात कसलंच बंधन नाही. नुकतंच बिहारच्या एका इंजिनिअरनं इंग्लंडहून आलेल्या मुलीशी लग्न केलं आणि तिला भारतात बोलावलं. आता कर्नाटकमधून एक प्रकरण समोर आलं की, एका ऑटो चालकाने बेल्जियमच्या मुलीशी लग्न केलं.

हे प्रकरण कर्नाटकातील विजयनगर इथल्या एका ऑटो चालकाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मुलीचं नाव कॅमिल असून अनंतराजू असं या ऑटो चालकाचं नाव आहे.

सोशल मीडियावर दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले. सोशल मीडियावर त्यांची आधी मैत्री झाली आणि मग हळूहळू ती मैत्री फुलू लागली.

30 वर्षीय अनंतराजू एका ऑटो चालकासोबत टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात आणि ही मुलगी आपल्या कुटुंबासमवेत आपल्या बेल्जियम या देशात राहते.

जेव्हा त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले. असेही सांगितले जात आहे की, वर्ष 2019 मध्ये कॅमिल आपल्या कुटुंबासह हम्पी, कर्नाटक येथे फिरायला आली होती.

मग अनंतराजू त्यांचे मार्गदर्शक बनले. अनंतराजू यांनीच त्यांना कर्नाटकात फिरवून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.

मुलगी आपल्या देशात गेली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचाही संपर्क आला. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

दरम्यान, मुलीने या रिक्षाचालकाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि होकारार्थी उत्तर मिळाले. कॅमिल आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह थेट भारतात पोहोचली. मंदिरात जाऊन तिने थाटामाटात लग्न केले. हा विवाह नुकताच पार पडलाय.

Follow Us
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...