‘कच्चा बादाम’ गाणे आठवतंय का? झोपडीत राहणारा गायक आज राहतोय बंगल्यात
इंटरनेटवर रातोरात व्हायरल झालेलं 'कच्चा बादाम' हे गाणं सर्वांनाच आठवत असेल. एवढंच नाही, तर हे गाणं गाणारा गायक भुबन बद्याकर याला देखील सगळे ओळखतात. पण तुम्हाला माहिती आहे का? सध्या त्याचं आयुष्य कसं चाललं आहे? भुबन बद्याकर झोपडीतून बंगल्यात स्थलांतरित झाला आहे.

इंटरनेटवर प्रसिद्धी मिळताच आयुष्य रातोरात बदलू शकतं आणि हे भुबन बद्याकरपेक्षा कोणीच चांगले सांगू शकत नाही. त्याच्या ‘कच्चा बादाम’ गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला होता. पण या व्हायरल गाण्यामागे संघर्ष, साधेपणा आणि अडचणींमधून शिकलेल्या धड्यांची कहाणी दडलेली आहे. जेव्हा यूट्यूबर निशु तिवारी याने त्याची भेट घेतली, तेव्हा त्याने हसतमुखाने आणि आपल्या खास शैलीत त्याचं स्वागत केलं. त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे.
भुबनने सांगितलं की ‘कच्चा बादाम’ गाण्याचा जन्म एका रोजच्या घटनेतून झाला. तो म्हणाला, ‘मी बदाम विकायचो. जेव्हा मी बदाम विकत असे, तेव्हा लोक माझा मोबाइल फोन चोरायचे. म्हणून मी ठरवलं की, मी या अनुभवावर एक गाणं बनवेन आणि गायले. मला सगळ्यांनी ते गाणं रेकॉर्ड करुन ऐकावं आणि त्यांना ते ऐकून हसू येऊ लागलं. ते पाहून माझी चिडचिड होत असे’ स्थानिक व्यक्तीने त्याचं गाणं रेकॉर्ड केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. काहीच दिवसांत ते व्हायरल झालं आणि आयुष्य पुन्हा कधीच पहिल्यासारखं राहिलं नाही.
वाचा: एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष! तपासात जे समोर आले त्याने पोलिसही हादरले
साध्या झोपडीतून पक्कं घर मिळालं
प्रसिद्धी मिळण्याआधी भुबन एका साध्या झोपडीत राहायचा. तो म्हणाला, ‘आता हे माझं घर आहे,’ असं अभिमानाने आपल्या घराकडे बोट दाखवत सांगितलं. याआधी, घराच्या नावाखाली फक्त एक छोटीशी झोपडी होती. पण व्हायरल झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट जी बदलली, ती म्हणजे हीच.
पैसे मिळाले पण हक्क हिसकावले गेले
जेव्हा त्याला विचारलं की त्याने या व्हायरल हिटमधून कमाई केली का, तेव्हा भुबन म्हणाला, ‘मी मुंबईला गेलो होतो. त्यांनी मला साधारण ६०,०००-७०,००० रुपये दिले. नंतर मी कोलकात्याला डीजी साहबांकडे गेलो, त्यांनी मला एक लाख रुपये आणि एक भेटवस्तू दिली. पण आता माझ्याकडे या गाण्याचा कॉपीराइट नाही.’ त्याने सांगितलं की कोणीतरी त्याला मोठमोठी स्वप्नं दाखवली, त्याच्याकडून कागदपत्रांवर सही घेतली आणि गाण्याचे हक्क हिसकावले. ज्या धुनने त्याचं आयुष्य बदललं, त्यानेच त्याला कायदेशीर अडचणींमध्ये अडकवलं.
व्हायरल झाल्याने आयुष्य सुधारलं
या सगळ्याच्या अडचणींवर मात करुन, ‘कच्चा बादाम’ ने भुबनसाठी नवीन मार्ग मोकळा केला. लोक त्याला रस्त्यावर ओळखू लागले, त्याच्याबरोबर सेल्फी काढू लागले आणि त्याला कार्यक्रम आणि रियालिटी शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करू लागले. तो हसत म्हणाला, ‘व्हायरल झाल्याने माझं आयुष्य सुधारलं आहे. आता लोक मला ओळखतात आणि माझा आदर करतात.’
