महाकाय शार्कने केली माणसाची शिकार, भर समुद्रात थरार, व्हिडीओ व्हायरल!
हा व्हिडीओ मूळचा इजिप्त देशातील असल्याचे बोलले जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून समुद्रात फिरण्यासाठी जाताना योग्य ती काळजी घ्यावी.

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या समुद्रातील एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका शार्कने चक्क माणसाला खाऊन टाकलं आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण घटेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शार्कने थेट माणसालाच खाऊन टाकलं
शार्क माशाला एखादं सावज सापडलं की काहीही झालं तरी तो आपली शिकार सोडत नाही. त्याचीच प्रचिता या व्हिडीओमध्ये आली आहे. हा मासा फारच आक्रमक असतो. तो आपल्या शिकारीवर तुटून पडतो. समुद्रातील इतर लहान मासेदेखील त्याच्यापासून दूर राहतात. याच एका शार्कने थेट माणसालाच खाऊन टाकलं आहे. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
एका व्यक्तीने रेकॉर्ड केला व्हिडीओ
शर्क माशाने माणसावर केलेल्या हल्ल्याचा संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. समोर बोटीमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शार्क मासा पाण्या एका माणसावर हल्ला करताना दिसतोय. तर माणूस या हल्ल्यापासून स्वत:चे संरक्षण करताना दिसतोय.
शार्कने माणसाला जबड्यात पकडलं अन्…
शार्क हल्ला केल्यानंतर काही वेळ त्या माणसाला मोकळं सोडताना दिसतोय. याच काळात हा माणूस शार्कपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पुढे शार्कने त्या व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला करून त्याला थेट पाण्यात बुडवल्याचे दिसत आहे. या जोरदार हल्ल्यानंतर समुद्रात फसलेल्या माणसाचे फक्त पाय दिसत आहेत. शेवटी शार्क माशाने या माणसाला आपल्या जबड्यात पकडून थेट पाण्यात खोल नेले आहे.
In Egypt you have to watch out for sharks. pic.twitter.com/GOH8MHH04T
— RadioGenoa (@RadioGenoa) July 19, 2025
एक्स या समाजमाध्यमावर @RadioGenoa या खात्यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला साधारण 94 लाख लोकांनी पाहिले आहे. तसेच लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान हा व्हिडीओ मूळचा इजिप्त देशातील असल्याचे बोलले जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून समुद्रात फिरण्यासाठी जाताना योग्य ती काळजी घ्यावी. अतिउत्साहात समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे सांगितले जात आहे.
