Viral: टेकडीवरच्या अंध वळणावर बाईक पळवण्याचा प्रयत्न अंगाशी, पाहा धक्कादायक Video

| Updated on: Nov 22, 2021 | 6:16 PM

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या बाईकवर वेगात कुठेतरी जाताना दिसत आहे. पण तितक्यात एक ब्लॅक टर्न म्हणजे अंध वळण येतं, जिथं गाडीचा वेग कमी करणं गरजेचं असतं. पण बाईकर तसं करत नाही.

Viral: टेकडीवरच्या अंध वळणावर बाईक पळवण्याचा प्रयत्न अंगाशी, पाहा धक्कादायक Video
बाईक अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ,
Follow us on

देशात दररोज हजारो रस्ते अपघात होतात. यापैकी बरेच लोक भयानक अपघातांना बळी पडले आहेत, तर काही लोक भाग्यवान आहेत की, ते थोडक्यात वाचले आहेत. बहुतेक अपघातांमध्ये लोक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे. ज्यात टेकडीवर बनवलेल्या एका ब्लॅड टर्नवर दुचाकीस्वार कारला धडकतो आणि थोडक्यात बचावतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही क्षणभर घाबरू शकतो.

ते म्हणतात ना… नजर हटी दुर्घटना घडी, तसाच काहीसा प्रकार या व्हिडीओत झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार नशीबवान होता की तो कोणत्याही दुर्दैवी घटनेचा बळी ठरला नाही. कारच्या धडकेतून थोडक्यात बचावल्यानंतर दुचाकीस्वाराला समजते की, त्याने किती मोठी चूक केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या बाईकवर वेगात कुठेतरी जाताना दिसत आहे. पण तितक्यात एक ब्लॅक टर्न म्हणजे अंध वळण येतं, जिथं गाडीचा वेग कमी करणं गरजेचं असतं. अशा ठिकाणी फलकही लावले आहेत. पण कदाचित या दुचाकीस्वाराला याची माहिती नसेल. एका आंधळ्या वळणावर आपले काय होणार आहे, याची त्याला कल्पना नव्हती. दुचाकीस्वार भरधाव वेगाने आंधळ्या वळणावर पोहोचताच समोरून एक कार जाते. हा खरोखरच धक्कादायक क्षण आहे.

चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

बाईकस्वार कारला धडकणं टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो नशीबवान होता की, बाईक आणि कारचा संपर्क झाला नाही. तसं झाले असते तर कदाचित टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या दरीत तो पडला असता.

इन्स्टाग्रामवर रॅपिडेंनी नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 23 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजरने बाईकस्वाराला सल्ला देत कमेंट केली आहे, ‘भाऊ, तुम्ही चुकीच्या ठिकाणी स्पीड घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा रस्ता आहे, रेसिंग ट्रॅक नाही. ” त्याच वेळी, दुसरा वापरकर्ता म्हणतो की बाइकर भाग्यवान होता की त्याने शेवटच्या क्षणी स्वतःला सांभाळले, अन्यथा तो एखाद्या दुर्घटनेचा बळी ठरू शकला असता. एकंदरीत हा अपघाताचा व्हिडिओ त्या सर्व दुचाकीस्वारांसाठी एक धडा आहे, जे जीव मुठीत घेऊन गाडी चालवतात.

हेही पाहा:

Video: ब्लॅक कोब्राला तरुणाने ग्लासने पाणी पाजलं, लोक म्हणाले, हाताने जीव देणं याला म्हणतात!

Viral Video: आजीच्या सांगण्यावरुन कुत्र्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर उड्या