Video: ब्लॅक कोब्राला तरुणाने ग्लासने पाणी पाजलं, लोक म्हणाले, हाताने जीव देणं याला म्हणतात!

Video: ब्लॅक कोब्राला तरुणाने ग्लासने पाणी पाजलं, लोक म्हणाले, हाताने जीव देणं याला म्हणतात!
कोब्राला ग्लासाने पाणी पाजले

व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातात पाण्याचा ग्लास असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्याच वेळी, एक काळा नाग त्याच्या अगदी जवळ दिसतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Nov 22, 2021 | 6:03 PM

सापांचे नाव ऐकताच अनेकांची अवस्था वाईट होते. अशा स्थितीत अचानक साप, तोही ब्लॅक कोब्रा सोबत आला तर काय होईल? तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावायला लागाल हे उघड आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक माणूस ग्लासमध्ये धोकादायक ब्लॅक नेक स्पिटिंग कोब्राला पाणी देताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातात पाण्याचा ग्लास असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्याच वेळी, एक काळा नाग त्याच्या अगदी जवळ दिसतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडिओ काही लोकांना आवडला आहे, तर काहींनी तो पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला वेडा म्हटले आहे. साप किती भयंकर दिसतोय हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मात्र, पाणी पिताना त्याने त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे हल्ला केला नाही. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की हा काळ्या मानेचा स्पिटींग कोब्रा आहे. त्याच्या विषाचा एक थेंबही माणसाला मारण्यास पुरेसा आहे.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

सापाचा हा अनोखा व्हिडिओ royal_pythons_ नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे एक अद्भुत दृश्य आहे. तहानलेला ब्लॅक स्पिटींग कोब्रा पाणी पीत आहे.’ 6 दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 1 लाख 16 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

हा वेडेपणा असल्याचे एका यूजरने म्हटले आहे. जर तो काळा स्पिटींग (विष थुंकणारा) कोब्रा असेल तर हातमोजे घालण्यात काही अर्थ नाही. तो इतका विषारी आहे की त्याचे विष हातमोज्यातून निघून तुमच्या शरीरात जाईल. मग याचा परिणाम काय होऊ शकतो हे समजू शकेल. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘कोणाला माहीत होते की सापांना पाणी पिताना पाहणे ही एक दिलासादायक गोष्ट असू शकते.’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, पाणी पिताना हा विषारी साप किती शांत आणि सुंदर दिसतो. एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

हेही पाहा:

Viral Video: आजीच्या सांगण्यावरुन कुत्र्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर उड्या

बरमोडा घालून बँकेत आल्याने SBI ने खातेदाराला बाहेर काढलं, नेटकरी म्हणाले, कसलेही नियम घालणाऱ्या SBI मधील खाती बंद करा!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें