Video | रस्त्याच्या वळणावर मस्ती, तरुण थेट आला बसखाली, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक भीषण अपघात दाखवण्यात आलाय. हा अपघात गुजरातमधील दाहोद येथील असून एका वळणरस्त्यावर ही घटना घडलीय. वळणाचा रस्ता असल्यामुळे सगळे प्रवासी आपली वाहनं जपून चालवत आहेत. याचवेळी रस्त्यावरुन एक बस जात आहे.

Video | रस्त्याच्या वळणावर मस्ती, तरुण थेट आला बसखाली, व्हिडीओ व्हायरल
accident video

मुंबई : आपल्या देशात रोजच अनेक अपघात होतात. यातील काही अपघात अतिशय भीषण असतात. अशा अपघातांना आपण कित्येक दिवस विसरु शकत नाही. सध्या तर अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच व्हिडीओतील तरुणावरही अनेकांनी टीका केलीय. (bike rider trapped under bed terrible accident went viral on social media)

दुचाकीस्वार थेट बसच्या खाली आला 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक भीषण अपघात दाखवण्यात आलाय. हा अपघात गुजरातमधील दाहोद येथील असून एका वळणरस्त्यावर ही घटना घडलीय. वळणाचा रस्ता असल्यामुळे सगळे प्रवासी आपली वाहनं जपून चालवत आहेत. याचवेळी रस्त्यावरुन एक बस जात आहे. बसचालक संतुलन राखत बस चालवत आहे. मात्र, यावेळी मध्येच अक्रित घडलंय. बसच्या मागून एक दुचाकीस्वार आला आहे. हा दुचाकीस्वार अतिशय वेगात आलाय. वेगात येऊन दुचाकीस्वाराने बसला मागे टाकलेय. मात्र, रस्ता वळणाचा असल्यामुळे दुचाकीस्वार थेट बसच्या खाली आला आहे.

नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले

वळणाच्या रस्त्यावर दुचाकीस्वार थेट बसच्या खाली आलाय. बसखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू होतो की काय, अशी शंका आपल्याला येऊन जाते. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून बसच्या खाली येऊनही त्याला कसलीही जखम झाली नाही. बसचालकाने वेळीच ब्रेक दाबल्यामुळे बसचालकाचे प्राण वाचू शकले.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी स्तब्ध झाले आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर दुचाकीस्वाराचे प्राण वाचल्यामुळे देवाचे आभार माणले आहेत. काही नेटकऱ्यांनी तरुणांनी वेगात वाहनं चालवून नयेत असा सल्ला दिला आहे. गुजरात राज्यात घडलेला हा अपघात पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या Prateek Pratap या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.

इतर बातम्या :

Video | इच्छेविरुद्ध लग्न होत असल्यामुळे नाराज, भर मंडपात नवरीने केलं ‘हे’ काम, व्हिडीओ व्हायरल

Video | ‘क्युटी पाय’ गाण्यावर क्यूट आजी आणि नातीचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फिदा!

VIDEO: ढोलकीच्या तालावर मुलाने असा काही आळवला सूर; गाणं ऐकून नेटिजन्स म्हणाले…

(bike rider trapped under bed terrible accident went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI