AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिनोद’चा ट्विटरवर पहिला नंबर, या वर्षी ठरला मीम्सचा बादशाहा

या वर्षी सोशल मीडियावर मीम्स, जोक्स सर्वच स्तरावर बिनोद नावाने धुमाकूळ घातला (Binod is 2020s most tweeted meme on twitter in India).

'बिनोद'चा ट्विटरवर पहिला नंबर, या वर्षी ठरला मीम्सचा बादशाहा
| Updated on: Dec 08, 2020 | 4:12 PM
Share

मुंबई : तुम्ही सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असाल, जनरल नॉलेजमध्ये तुम्ही हुशारही असाल, मात्र तुम्हाला जर बिनोद माहिती नसेल तर तुम्हाला खरंच काहीच माहिती नाही. बिनोद हे सोशल मीडियावर या वर्षात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं नाव. बिनोद अजूनही तुमच्या लक्षात येत नसेल तर आम्ही तुम्हाला आठवण करुन देतो. बिनोद ही तीच व्यक्ती आहे, ज्याने अनेक व्हिडीओंवर कमेंट करताना फक्त स्वत:चं नाव टाकलं होतं. तेव्हापासून बिनोद हे नावं प्रचंड चर्चेत आलं. सोशल मीडियावर मीम्स, जोक्स सर्वच स्तरावर बिनोद नावाने धुमाकूळ घातला (Binod is 2020s most tweeted meme on twitter in India).

बिनोदच्या चर्चेची कहानी सांगायची झाल्यास तर ती Slay Point या यूट्यूब चॅनलपासून सुरु झाली. बिनोद थारु या व्यक्तीने प्रत्येक व्हिडीओच्या कमेंटमध्ये फक्त स्वत:चं नाव दिलं होतं. हीच बाब Slay Point ने सर्व प्रेक्षकांसमोर आणली. खरंतर Slay Point सोशल मीडियावरच्या विचत्र कमेंटवर व्हिडीओ बनवणं किंवा संबंधित व्यक्तींना ट्रोल करण्याचं काम करतं. मात्र, जेव्हा Slay Point ने बिनोदच्या कमेंटवर व्हिडीओ केला तेव्हा बिनोद नाव किती प्रसिद्ध झालं याचा अंदाज त्यांनाही लावता आला नाही.

त्यानंतर बिनोद नाव सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झालं. सोशल मीडियावर जिथे बघावं तिथे बिनोदच्या संबंधित मीम्स, जोक्स व्हायरल होऊ लागले. आता तर ट्विटरने सर्वात जास्त शेअर होणाऱ्या मीम्सची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये बिनोद नावाशी संबंधित मीम्स टॉपवर आहे. बिनोद नानाशी संबंधित मीम्सचे ट्विट 2020 साली सर्वाधित करण्यात आले.

Paytm ने ट्विटर हँडलचं नाव बिनोद केलं

ट्विटरवर एका गब्बर नावाच्या युजरने पेटीएमला कंपनीला त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव बिनोद करण्याचं आव्हान दिलं होतं. तर ते आव्हान पेटीएमने स्वीकारलं देखील होतं. पेटीएमने त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव थेड बिनोद ठेवलं होतं (Binod is 2020s most tweeted meme on twitter in India).

मुंबई पोलिसांचं मजेशीर ट्विट

बिनोद नावावरुन मुंबई पोलिसांनी देखील मजेशीर ट्विट केलं होतं. “प्रिय बिनोद, आम्हाला आशा आहे की, तुमचं नावचं तुमचा पासवर्ड नसेल. जर तसं असेल तर तातडीने पासवर्ड बदला. कारण तुमचं नाव प्रचंड व्हायरल होत आहे”, असं मुंबई पोलिसांनी ट्विट केलं होतं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.