AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एक छोटासा पक्षी सगळ्यांवर भारी! व्हिडीओ बघाच

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील अनेकदा व्हायरल होत असतात आणि हे व्हिडिओ लोकांना हसवणारे आणि लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे देखील आहेत. आजकाल असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

फक्त एक छोटासा पक्षी सगळ्यांवर भारी! व्हिडीओ बघाच
Bird viral videoImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 06, 2023 | 6:49 PM
Share

मुंबई: सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. मग तो मजेशीर व्हिडिओ असो किंवा इमोशनल व्हिडिओ किंवा असा कोणताही व्हिडिओ जो पाहून लोक आश्चर्यचकित होतात. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील अनेकदा व्हायरल होत असतात आणि हे व्हिडिओ लोकांना हसवणारे आणि लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे देखील आहेत. आजकाल असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

एका छोट्या पक्ष्याने गायींच्या कळपाची अवस्था वाईट केलीये. या छोट्याशा पक्षाने गाईंना तिथून पळून जाण्यास भाग पाडले. एवढ्या मोठ्या प्राण्याला त्याने आपल्या हुशारीने पळवून लावले. व्हिडीओ पाहून तुम्ही त्याच्या धाडसाचे कौतुक कराल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही गायी शेतात उभ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये एक छोटा पक्षी देखील आहे. या दरम्यान एक गाय त्या पक्ष्याला घाबरवण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न करते, पण पक्षी घाबरण्याऐवजी गायींना घाबरवतो. तो इतकं धाडस दाखवतो की तो गायींना मागे हटायला भाग पाडतो आणि शेवटी त्यांना तिथून हाकलून देतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @AmazingNature00 नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘निसर्गाने आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित केले आहे’. अवघ्या 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 12 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, मलाही अशा धाडसाची गरज आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘आत्मविश्वास बघा’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने ‘हा पक्षी खूप धाडसी आहे’, असे लिहिले, तर एकाने लिहिले की ‘एका पक्ष्याने इतक्या गायींना घाबरवले हे आश्चर्यकारक आहे.”

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच