बॉडीकॉन की बॉडी फिटेड या दोन ड्रेसमध्ये असतो मोठा फरक; महिलांनी नक्की वाचा हे 4 महत्त्वाचे मुद्दे
फॅशनच्या जगात तुम्हीही ‘बॉडीकॉन’ आणि ‘बॉडी फिटेड’ ड्रेस एकच समजता का? मग थांबा! हे दोन ड्रेस एकमेकांपासून खूपच वेगळे असतात. त्यांच्या डिझाइनपासून ते कपड्यांपर्यंत, अगदी त्यांना कोणत्या प्रसंगी घालावं हे सुद्धा पूर्णपणे वेगळं असतं. आज आम्ही तुमच्यासाठी या दोन ड्रेसमधील नेमके चार मोठे फरक घेऊन आलो आहोत, जे प्रत्येक तरुणीला आणि महिलेला माहिती असणे गरजेचे आहे.

फॅशनच्या जगात दररोज नवनवीन ट्रेंड्स येत असतात, आणि महिलांसाठी ड्रेसची निवड हा नेहमीच विचाराचा विषय ठरतो. बॉडीकॉन आणि बॉडी फिटेड हे असे दोन ड्रेस प्रकार आहेत जे दिसायला थोडेसे मिळते-जुळते वाटले तरी त्यांच्या डिझाइनपासून वापराच्या वेळेपर्यंत सर्वच बाबतीत मोठा फरक असतो. अनेकदा महिलांना हे ड्रेस सारखेच वाटतात आणि चुकीच्या प्रसंगासाठी चुकीचा ड्रेस निवडला जातो. म्हणूनच, आजच्या लेखात आम्ही सांगणार आहोत या दोन ड्रेसमधील 4 महत्त्वाचे फरक जे प्रत्येक फॅशनप्रेमीने नक्कीच लक्षात ठेवावेत.
या गोष्टी आहेत वेगळ्या
1. कटिंग आणि डिझाइन
बॉडीकॉन ड्रेस पूर्णतः टाइट असतो. तो शरीराच्या प्रत्येक वक्र भागावर फिट बसतो आणि त्याला उभार देतो. यामध्ये कटिंग अशा प्रकारची असते की ती तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला हायलाइट करते. दुसरीकडे, बॉडी फिटेड ड्रेस तुलनेने थोडी सैल आणि स्ट्रक्चरल असते. ती शरीरावर फिट बसते खरी, पण तिचं सिल्युएट थोडं मोकळं असतं. त्यामुळे ती कमी टाईट आणि अधिक आरामदायक भासते.
2. फॅब्रिक
बॉडीकॉन ड्रेस तयार करताना स्पॅन्डेक्स, पॉलिएस्टर आणि इतर स्ट्रेचेबल फॅब्रिक वापरले जातात. त्यामुळे हे ड्रेस शरीराला बिलकुल चिकटून राहतात. याउलट, बॉडी फिटेड ड्रेसमध्ये कॉटन, सिल्क, लिनेन यासारख्या नॅचरल आणि श्वास घेणाऱ्या फॅब्रिकचा वापर होतो. त्यामुळे या ड्रेसमध्ये तुम्हाला मोकळेपणा आणि सहजता जाणवते.
3. कम्फर्टेनेस
बॉडीकॉन ड्रेस दिसायला कितीही गॉर्जियस असले तरी ते फार वेळ घालण्यासाठी कम्फर्टेबल नसतात. उष्ण हवामानात तर हे ड्रेस घालणं अधिकच अवघड होऊ शकतं. लांब वेळ घालवायचा असेल तर बॉडी फिटेड ड्रेस अधिक योग्य पर्याय आहे. कारण हे ड्रेस थोडे लूज असल्याने ते अधिक श्वास घेण्याजोगे असतात आणि शरीराला आराम देतात.
4. लुक आणि प्रसंगानुसार
बॉडीकॉन ड्रेस प्रामुख्याने पार्टी, क्लब किंवा डेट नाईटसाठी योग्य मानले जातात. यामध्ये ग्लॅमर आणि स्टाईलचा भरपूर डोस असतो. दुसरीकडे, बॉडी फिटेड ड्रेस अधिक सोज्वळ आणि क्लासी वाटतो. त्यामुळे हे ड्रेस कॉलेज, ऑफिस किंवा कौटुंबिक समारंभांसाठी परिपूर्ण पर्याय ठरतात.
शेवटी काय ?
तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी शॉपिंगसाठी जाल, तेव्हा या माहितीचा उपयोग करा आणि योग्य प्रसंगासाठी योग्य ड्रेसची निवड करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
