अनंत अंबानींनी 108 किलो वजन कमी कसं केलं होतं? अनेक बॉलिवूड स्टारचाही तोच फिटनेस ट्रेनर
अनंत यांना अस्थमा होता असल्याने त्याची औषधे त्यांना सुरू होती, त्यामुळे त्यांचे वजन वाढले होते आणि शरीरदेखील मोठे होऊ लागले होते.

मुंबई : आपलं वजन आणि फिटनेस उत्तम राहावा यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्ट प्रयत्न करीत असतात, त्यासाठी चांगला फिटनेस ट्रेनर मिळवा यासाठी शोध घेतला जातो. असाच शोध अनंत अंबानी यांनी काही दिवसापूर्वी घेतला होता आणि तब्बल 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी करून दाखविले होते. वजन कमी केल्याच्या या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर अनंत यांनी इतके वजन कमी कसे केले ? वजन करण्यासाठी कुठला फिटनेस ट्रेनरची मदत घेतली ? कोणत्या टिप्स वापरल्या अशा विविध चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या. त्याचं उत्तर एकच होतं ते म्हणजे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना. विनोद चन्ना यांनीच अनंत अंबानी यांचे वजन कमी केले होते. याबाबत विनोद यांनी काही टिप्स शेयर केल्या असून अनंत अंबानी यांचे वजन कमी कसे झाले हे सांगितले आहे.
अनंत यांच्याशिवाय विनोद चन्ना बॉलिवूडमधील अनेक स्टार्सला प्रशिक्षण देत आहे, यामध्ये जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना आणि रितेश देशमुख यांसारख्या बड्या स्टार्सना ट्रेनिंग देतो आणि डायट प्लॅनही देतो.
विनोद चन्ना यांच्या माहितीनुसार, अनंत अंबानी यांचे वजन कमी करण्यासाठी फक्त नैसर्गिक पद्धतींचा वापर करण्यात आला असून सुरक्षित पद्धत म्हणून ओळख आहे.
अनंत यांना अस्थमा होता असल्याने त्याची औषधे त्यांना सुरू होती, त्यामुळे त्यांचे वजन वाढले होते आणि शरीरदेखील मोठे होऊ लागले होते.
अनंत यांची आरोग्यची स्थिती जाणूनच त्यांचा डायट प्लॅन तयार करण्यात आला होता, याशिवाय दररोज पाच ते सहा तासांचा व्यायाम आणि दररोज 20 किलोमीटर चालणे असा समावेश होता.
View this post on Instagram
विशेष म्हणजे हा सर्व प्लॅन अनंत यांच्या मुंबईतील घरीच केला जात होता, फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना हे घरी जाऊन अनंत यांच्याकडून सर्व करून घेत होते.
डायट प्लॅनमध्ये साखरचा वापर नसेल असे अन्न दिले जात होते, फळे, पनीर आणि भाज्यांचा त्यांच्या आहारात समावेश होता. यासोबतच गाईचे दूध, धान्य आणि सूपही आहाराचा भाग होता.
