
लहान मुले निरागस असतात. त्यांच्या निरागसपणामुळे सर्वांना नेहमीच ती आवडतात.त्यांच्या नटखटपणामुळे आपल्या ओटांवर हसु येत असते. आता एक सोशल मीडियावर एका अशाच निरागस मुलाचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा शाळेत जाता-जाता अचानक रस्त्यावर थांबला, त्याला भूक लागल्याने त्याने गल्लीत खाली पायांच्या चवड्यावर बसूनच आपला लंच बॉक्स उघडला आणि नुडल्स खाऊ लागला. त्याचा हा व्हिडीओ सर्वांना आवडला असून मुले किती निष्पाप आणि निरागस असतात त्याचे दर्शन या व्हिडीओतून होत आहे.
व्हीडिओत तुम्ही पाहू शकता की लहान मुलगा शाळेत चालला होता. परंतू रस्त्यातच त्याला भूक लागली. मग त्याला त्याच्या आईने दिलेला लंच बॉक्स कामी आला. त्यामुळे त्याने लंच टाईमची वेळ न पाहाता रस्त्यातच पायाच्या चवट्यावर बसून आपला लंच टाईम सुरु केला. आणि कोणाचीही पर्वा न करता तो त्याच्या डब्यातील नूडल्स खाऊ लागला.
येथे पाहा व्हिडीओ –
शाबास बेटा शाबास 👇👇😛😄
बच्चा स्कूल जाते हुए रास्ते में लगी भूख स्कूल तो देखा जाएगा पहले पेट पूजा आप सबसे यह गुजारिश है बच्चों को स्कूल खुद छोड़कर आए pic.twitter.com/QcOmjXTgBN
— IMRAN (@MOHDIMR1994) September 9, 2025
मुलाला रस्त्यात असे खाताना पाहून अनेक लोक त्याच्या जवळ गेले आणि त्याची ही कृती पाहून हसूही लागले. त्यावेळी कोणी तरी बघ्याने त्याचा व्हिडीओ मोबाईलवर शुट केला. हा लहान मुलगा कोणतीही घाई न करता त्या गल्लीत आरामात बसून डबा खाऊ लागला आणि आईने दिलेल्या नुडल्सचा आनंद घेऊ लागला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच या मुलाच्या निरागसतेला लोकांनी पसंत केले आहे. लोक या व्हिडीओला खूपदा पाहात आहेत आणि शेअर देखील करीत आहेत. लहानगा नुडल्स खाताना किती निरागस आणि निष्पाप तसेच गोड दिसत आहे. आजूबाजूचे लोक त्याच्याशी संवाद देखील सादत आहेत.त्याची ही डब्बा खाण्याची पद्धत पाहून त्यांना हसायला देखील येत आहे. परंतू यामुलाचे लक्ष फक्त आपला डबा खाण्याकडे लागले आहे.