AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरांनी मृत घोषित केले; पण नशिबाने वाचवले, मृत महिला कशी झाली जिवंत? तो व्यक्तीने…

जगभरात अनेक घटना घडत असतात, पण सध्या समोर आलेली घटना पाहून अनेक लोकांनी रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काय आहे ती घटना?

डॉक्टरांनी मृत घोषित केले; पण नशिबाने वाचवले, मृत महिला कशी झाली जिवंत? तो व्यक्तीने...
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 26, 2026 | 1:35 PM
Share

जगभरात अशा काही घटना घडतात ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. याला चमत्कार याशिवाय दुसरे कोणतेही नाव देता येत नाही. ब्राझीलच्या साओ पाउलो शहरातून अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली असून रस्ते अपघातानंतर मृत घोषित करण्यात आलेली एक महिला अचानक पुन्हा जिवंत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फर्नांडा क्रिस्टीना पोलिकार्पो असे या महिलेचे नाव असून 18 जानेवारी रोजी साओ पाउलोतील SP-294 मोटरवेवर ती एका कारच्या धडकेत गंभीर जखमी झाली होती. ही धडक इतकी भीषण होती की फर्नांडा रस्त्याच्या मधोमध फेकली गेली. अपघाताची माहिती मिळताच सामू या आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.

मृत घोषित करून कफनात गुंडाळले

प्राथमिक तपासणीनंतर पॅरामेडिकने फर्नांडाला मृत घोषित केले. ठरलेल्या वैद्यकीय प्रक्रियेनुसार तिच्या शरीरावर सिल्व्हर रंगाच्या फॉइल ब्लँकेटने आच्छादन घालण्यात आले आणि तिला शवागारात हलवण्याची तयारी सुरू झाली. दरम्यान, फर्नांडाच्या आई अ‍ॅड्रियाना आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. ही बातमी ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तरुण मुलीचा मृत्यू कोणत्याही आईसाठी असह्य असतो. मात्र नियतीने या कुटुंबासाठी वेगळाच वळण राखून ठेवले होते.

अपघातानंतर काही वेळाने दुसरा पॅरामेडिक घटनास्थळी दाखल झाला. त्याचे काम मृतदेह हटवण्यास मदत करणे होते. मात्र, फर्नांडाजवळ जाताच त्याला काहीतरी वेगळे जाणवले. गंभीर जखमा असूनही तिचा श्वास सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. फर्नांडाला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 20 जानेवारी रोजी सायंकाळी रुग्णालय प्रशासनाने बुलेटिन जारी करत फर्नांडाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिची स्थिती आता स्थिर असून येत्या काही दिवसांमध्ये तिची ब्रीदिंग ट्यूब काढण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय व्यवस्थेतील चुकांवर प्रश्न उपस्थित

न्यूरोसर्जरी तज्ज्ञांच्या पथकाने हळूहळू तिला दिली जाणारी बेशुद्धावस्थेची औषधे कमी करण्यास सुरुवात केली आहेत. जेणेकरून तिला शुद्धीवर आणता येईल. डॉक्टर सध्या ती व्हेंटिलेटरशिवाय श्वास घेऊ शकते का याची चाचपणी करत आहेत. ही घटना केवळ एका महिलेच्या चमत्कारिक पुनर्जन्माची कथा नाही तर आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेतील चुकांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.