
आपल्या एक्स बॉयफ्रेंडला जळवायला ती लग्न करते. आलेल्या स्थळाला होकार देते. तिला वाटतं लग्नाची बातमी ऐकून तिचा एक्स बॉयफ्रेंड जागेवर येईल आणि त्यांचं भांडण मिटेल. पण असं होत नाही, लग्नाचा दिवस येतो ती लग्नमंडपात जाते पण तिचा बॉयफ्रेंड काय तिथे येत नाही. हा किस्सा खूप व्हायरल झालाय. बरं इतकं सगळं होऊन ती मुलगी पुढे जे करते ते अजूनच भन्नाट आहे.
आता असे अनेक लोक आहेत, ज्यांचे लग्नाआधीच प्रेम प्रकरण असतात. पण ही लोकं लग्नानंतर आधीच्या गोष्टी सोडून पुढे जातात.
एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिने आपल्या नवरदेवासमोर एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी असं काही तरी करते, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बरबाद होतं.
खरं तर प्रियकराला जळवण्यासाठी प्रेयसी दुसऱ्या मुलाशी लग्न करण्यासाठी ‘हो’ म्हणते. प्रेयसीला वाटतं की, जेव्हा ती दुसऱ्या मुलाशी लग्न करत असेल तेव्हा प्रियकर तिथे येऊन तिचं लग्न मोडेल.
तिला हीच गोष्ट भारी पडते. कारण, यानंतर लग्नाची तारीख ठरते. लग्नाचा दिवसही येतो पण बॉयफ्रेंडचा काय तपास नसतो. तो येतच नाही.
लग्न होतं आणि लग्नानंतर नवरी आपल्या पतीसोबत एका स्टुडिओत जाते. तिथे तिला एक पत्रकार विचारतो की तिला कोणासाठी गायचे आहे, तेव्हा वधू म्हणते की तिला तिच्या ‘एक्स’ साठी गाण्याची इच्छा आहे.
यावर रिपोर्टर प्रश्न विचारतो, तुमच्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे? उत्तर देताना मुलगी म्हणते, “मी त्याचं नाव घेऊ शकत नाही कारण नाव घेतलं तर त्याची बदनामी होईल.
व्हिडिओत दिसतं की, यानंतर नवरी अचानक रडू लागते. यावर रिपोर्टर विचारतो की तू का रडत आहेस? यावर नवरी उत्तर देते, “माझं माझ्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम आहे, पण त्याचं दुसरीवर प्रेम आहे. त्याला जळवण्यासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण तो आला नाही. मी बरबाद झालीये.”