ब्रिटीश उच्चायुक्तांनी घेतला मुंबईच्या सँडविच आणि चिली आइस्क्रीमचा आनंद, सोशल मीडियावर खळबळ
नेटकऱ्यांनी त्यांचं आणि मुंबईच्या खाद्य पदार्थांचं भरभरून कौतुक केलं.

ब्रिटीश उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरून मुंबईच्या प्रसिद्ध स्नॅक्सची चव चाखली. त्यांनी या संदर्भातली पोस्ट सोशल मीडियावर टाकताच ती व्हायरल करण्यात आली. नेटकऱ्यांनी त्यांचं आणि मुंबईच्या खाद्य पदार्थांचं भरभरून कौतुक केलं. एलिसने स्नॅक्सचा आनंद घेतानाची स्वत: ची दोन छायाचित्रे पोस्ट केलीत. या फोटोमध्ये मिस्टर एलिस मुंबईच्या प्रसिद्ध सँडविच आणि चिली आइस्क्रीमचा आनंद घेताना दिसत आहेत.
ॲलेक्स एलिसने लिहिले की, ‘आज मुंबईकरांसारखं खात आहे – मुंबई सँडविच आणि चिली आइस्क्रीम ट्राय करतोय. इतकंच नाही तर आपल्या कॅप्शनमध्ये मराठीत ‘या जेवायला!’ असंही म्हटलंय. एलिसने गुरुवारी हे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या पोस्टला 1 लाख 36 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 2400 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
Eating like a #Mumbaikar today – trying the मुंबई सैंडविच and chilli ?️ ice cream. #BombaySandwich
या जेवायला! pic.twitter.com/24Xu9lkKQH
— Alex Ellis (@AlexWEllis) January 12, 2023
या पोस्टवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. अनेक ट्विटर युजर्सनी त्याला पुढे आणखी काय ट्राय करावे हे सांगितले.एका वापरकर्त्याने लिहिले, “हाय अलेक्स, आशा आहे की आपण सहमत आहात की मुंबई सँडविच ही स्वतःच एक लीग आहे आणि अधिकाधिक मान्यता मिळण्यास पात्र आहे?
