Trending Quiz : कोणत्या देशात फोटो काढणं अपराध ? कोणता प्राणी डोळे बंद करूनही पाहू शकतो ?

Trending Quiz : GK म्हणजे क्षेत्रासाठी विविध विषयांची , फॅक्ट्सची समज. यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बरेच काही समाविष्ट आहे. सामान्य ज्ञान असणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. त्यामुळे विविध विषयांची माहिती मिळते. जगातील अशाच काही विविध विषयांवरचे प्रश्न आम्ही विचारतो आहोत, तुम्हाला त्याची उत्तरं माहीत आहेत का ?

Trending Quiz : कोणत्या देशात फोटो काढणं अपराध ? कोणता प्राणी डोळे बंद करूनही पाहू शकतो ?
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का ?
| Updated on: Feb 25, 2025 | 2:32 PM

नोकरीच्या किंवा कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञान अपडेट असणं फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं विचारणार आहोत, ज्याबद्दल जाणून घएणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्वरूपात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे सामान्य ज्ञान जितके चांगले असेल तितकी नोकरी मिळण्याची शक्यता जास्त. बघा, यातल्या कोणत्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहीत आहेत ?

प्रश्न – कोणत्या देशात फोटो काढणं अपराध मानलं जातं ?
उत्तर – याचं उत्तर आहे तुर्कमेनिस्तान. हा एकमेव देश आहे जिथे फोटो काढणे हा गुन्हा मानला जातो.

प्रश्न – भारतात एकूण किती नद्या आहेत ते सांगता येईल का?
उत्तर – खरंतर भारतात सुमारे 400 नद्या आहेत.

प्रश्न – प्लास्टिक बंदी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर – हिमाचल प्रदेश हे भारतात प्लास्टिक बंदी करणारे पहिले राज्य आहे.

प्रश्न – भारतीय रेल्वेसाठी इंजिन बनवण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्ही सांगू शकाल का?
उत्तर – तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या की भारतीय रेल्वेसाठी इंजिन बनवण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च येतो.

प्रश्न – कोणता प्राणी असा आहे की डोळे बंद करूनही पाहू शकतो?
उत्तर – ऊंट

प्रश्न – असा कोणता प्राणी आहे जो विश्वासघाताच्या भीतीने आपल्या स्त्री जोडीदाराचा हात धरून झोपतो?
उत्तर – खरं तर, याचं उत्तर आहे उदमांजर. ते त्यांच्या मादी जोडीदाराचा हात धरून झोपतात कारण त्यांना भीती वाटते की त्यांचा जोडीदार दुसऱ्या ओटरबरोबर निघून जाईल.

प्रश्न – कोणती गोष्ट चहासोबत खाल्ल्याने माणसाचा जीव जाऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का?
उत्तर – दुधाच्या चहासोबत लिंबू खाल्ल्याने माणसाचा जीवही जाऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण सेवन केल्यानंतर ते खूप वाईट कॉम्बिनेशन तयार करते.

प्रश्न – असा कोणता प्राणी आहे जो आपली जीभ हलवू शकत नाही ?
उत्तर – याचं उत्तर आहे मगर.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)