AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : बाळ रडताच चिनी आई बाळला ऐकवते हनुमान चालीसा; बाळ शांत होऊन 2 मिनिटांत झोपी जातं, महिलेने पोस्ट करत शेअर केला अनुभव

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या सारा जेन हो यांनी बाळाला शांत करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, हनुमान चालीसा सुरू केल्यानंतर बाळ काही सेकंदांत शांत होतं आणि लवकरच झोपतं. तिची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video  : बाळ रडताच चिनी आई बाळला ऐकवते हनुमान चालीसा; बाळ शांत होऊन 2 मिनिटांत झोपी जातं, महिलेने पोस्ट करत शेअर केला अनुभव
hanuman chalisa viral postImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 8:12 PM
Share

बाळ रडायला लागल्यावर घरात आई बाबांची धावपळ सुरू होते. मग ते बाळ कोणत्या देशातलं काही असेना आई बाबांची धावपळ ठरलेली असते. पण अमेरिकेत राहणाऱ्या एका चिनी महिलेने अशी काही आयडिया केली आहे, ज्यामुळे तिच्या बाळाने कितीही चिडचिड केली तरी तो मंत्र ऐकून क्षर्णार्धात शांत होतं आणि झोपीही जातं.

बाळ रडायला लागलं की ही महिला थेट हनुमान चालिसा लावते. तिच्या म्हणण्यांनुसार, हनुमान चालीसा सुरू केल्यानंतर तिचं बाळ अवघ्या 5 सेकंदात शांत होतं आणि 2 मिनिटांत झोपीही जातं. याबाबतची माहिती महिलेने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

या महिलेचं नाव सारा जेन हो असून ती चिनी वंशाची व्यावसायिक महिला आहे. ती अमेरिकेतली लॉस एंजेलिसमध्ये राहते. वयाच्या 40व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून ती आई झाली. तिच बाळ हे 4 महिन्यांच आहे. आई झाल्यानंतर सारा आपल्या बाळाच्या रोजच्या दिनचर्येबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. त्यात तिने बाळ रडल्यावर त्याला शांत करण्यासाठी हनुमान चालिसा लावण्याचा अनुभवही शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Sara Jane Ho (@sarajaneho)

हनुमान चालिसाशी महिलेचा संबंध कसा आला

साराने तिच्या पोस्ट मध्ये सांगितलं आहे कि हनुमान चालिसाबद्दल तिला तिच्या भारतीय मित्रांकडून माहिती मिळाली. अमेरिकेतली ‘बर्निंग मॅन’ या कार्यक्रमासाठी तिची काही भारतीय मित्रांशी ओळख झाली होती. त्यांच्याकडून तिने हनुमान चालीसा ऐकली तिच माहत्म्य ऐकलं, त्यानंतर तिने तिच्या बाळाला ऐकवली.

बाळ चिडचिड करत असेल किंवा रडत असेल तर ती आधी त्याला कडेवर घेते. ती काही वेळ बाळाला रडू देऊन स्वत:हून शांत होण्यासाठी काही ना काही करते. पण यानंतरही बाळ शांत होत नसेल तर हनुमान चालीसाचा बाळाला ऐकवते. त्यानंतर काही सेकंदातच तिचं बाळ शांत होतं आणि 2 मिनिटांत झोपीही जातं. सारा बाळाला फक्त हनुमान चालिसाच नाही तर ब्रह्मर्षि अंगाई देखील ऐकवते. संगीतामुळे बाळाच्या चांगला विकास होतो. विकासाला एक चांगले वळण मिळते अशी तिची मान्यता आहे.

सोशल मीडियावर चर्चा

साराने हनुमान चालिसाला ‘इंडियन साँग ‘ असा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर काही लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हनुमान चालीस हे केवळ गाणं नसून हिंदू धर्मातील श्रद्धेचा आणि भक्तीचा भाग असलेली रचना असल्याचं सांगितलं आहे. तर बाकी नेटकऱ्यांनी बाळाला आर्शीर्वादही दिले आहेत.

Follow Us
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल