फक्त अंधारातच डसतो… असा भयंकर साप की डंख लागताच माणूस खल्लास; नाव ऐकताच थरथरतात लोक

सापांचा सायलेंट किलर... 'हा' साप डसल्यास माणूस खल्लास, व्यक्तीला मुंगी किंवा डास चावल्यासारखं वाटतं, पण... अशी प्रजाती आहे जी कोब्रापेक्षा पाचपट जास्त विषारी सर्पतज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती...

फक्त अंधारातच डसतो... असा भयंकर साप की डंख लागताच माणूस खल्लास; नाव ऐकताच थरथरतात लोक
फाईल फोटो
| Updated on: Oct 26, 2025 | 1:39 PM

Common Krait : साप पाहिल्यानंतर सर्वांनाच भीती वाटते. असे अनेक साप आहेत जे फार विषारी नसतात. पण काही असे देखील साप आहेत, जे डसताच व्यक्तीचा मृत्यू होतो. भारतात देखील असे काही साप आहेत, जे विषारी साप आहेत. भारतातील सर्वात विषारी सापांच्या पहिल्या यादीत कॉमन क्रेटचा समावेश आहे. या सापाचा विष इतका प्राणघातक आहे की, चावल्यानंतर काही मिनिटांतच माणूस मरू शकतो. याला सापांचा सायलेंट किलर म्हणूनही ओळखलं जातं. कारण जेव्हा कॉमन क्रेट हल्ला करतो तेव्हा व्यक्तीला मुंगी किंवा डास चावल्यासारखं वाटतं. पण कॉमन क्रेट साप चावल्यानंतर व्यक्तीचं निधन होतं.

सर्पतज्ज्ञांच्या मते, कॉमन क्रेट ही एक अशी प्रजाती आहे जी कोब्रापेक्षा पाचपट जास्त विषारी आहे. त्याचा चावा वेदनारहित असतो, त्यामुळे बहुतेक लोकांना कळून येत नाही आणि नकळतच त्यांचा मृत्यू होतो. साप पकडणारे महादेव पटेल यांनी या सापाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

महादेव पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमन क्रेट हा साप भारतात तसेच बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या देशांमध्ये आढळतो. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे आणि बहुतेकदा हिवाळ्यात आढळतो. कॉमन क्रेट हा साप फक्त रात्रीच सक्रिय असतो आणि महत्त्वाचं म्हणजो तो चावल्यानंतर शरीरावर कोणतीच खूण दिसत नाही.

पण कॉमन क्रेट चावला आहे हे लक्षणांवरुन कळून येतं… परंतु लक्षणे दिसण्यापूर्वीच, सापाने चावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा तो अर्धांगवायूचा बळी ठरतो. तज्ज्ञांच्या मते, साप शरीराची उष्णता जाणवतात आणि जवळ येतात आणि शारीराला घट्ट चिकटून राहतात. एखादी व्यक्ती उलटताच साप चावतो. त्यामुळे, बहुतेक प्रकरणांमध्ये, छाती, पोट आणि काखेवर सापाने डसल्याच्या खुणा आढळतात. साप उब मिळावी म्हणून कपड्यांमध्ये आणि अंथरुणातही लपतात, म्हणून त्याचा वापर काळजीपूर्वक करा.

महादेव यांनी सांगितल्यानुसार, कॉमन क्रेट चावल्यानंतर तुम्ही तात्काळ जवळच्या रुग्णालयात पोहोचलं पाहिजे. साप चावल्यानंतर व्यक्तीने शांत राहावं. घाबरू नये, जास्त हालचाल करू नका आणि अजिबात धावू नका. यामुळे रक्ताभिसरण वाढेल, ज्यामुळे विष रक्तात वेगाने पसरेल.
कॉमन क्रेट दिसायला काळा आणि तपकिरी असतो. त्याच्या शरीराची त्वचा चमकदार असते. तोंडापासून थोड्या अंतरापर्यंत पांढरे डाग पसरलेले असतात. तोंडापासून शेपटापर्यंत दोन पांढऱ्या लाईन असतात. हे साप उंदीर आणि बेडूक खाण्यास प्राधान्य देतात, म्हणून ते बहुतेकदा शेतात दिसतात.

Follow Us