वायाच्या 50 व्या वर्षी गायकाने 16 वर्ष लहान महिलेसोबत थाटला दुसरा संसार, लैंगिक शोषणाचे त्याच्यावर आरोप
लैंगिक शोषणाचे आरोप अललेल्या गायकाने 50 व्या वर्षी थाटला दुसरा संसार, 16 वर्ष लहान आहे दुसरी बायको... दोघांचे फोटो सर्वत्र व्हायरल..., सध्या गायकाच्या खासगी आयुष्याची रंगतीये सर्वत्र चर्चा...

झगमगत्या विश्वात एक गोष्ट कायम चर्चेत असते आणि ती म्हणजे, सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य… ब्रेकअप, लग्न, घटस्फोट, याबद्दल सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. गायकाने वयाच्या 50 व्या वर्षी स्वतःपेक्षा 16 वर्ष लहान महिलेसोबत लग्न केलं आहे. ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे देखील आरोप लागले आहेत. आता त्याच गायकाने 16 वर्ष लहान महिलेसोबत दुसरा संसार थाटला आहे.
सध्या ज्या गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे, त्या गायकाचं नाव रघू दीक्षित असं आहे. एक काळ असा होता जेव्हा गायक वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘टू स्टेट’ सिनेमातील ‘मस्त मगन’ गाणं गाणारी गायिका चिन्मयी श्रीपदा हिने रघू दीक्षित याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते…
चिन्मयी हिच्या आरोपांनंतर रघू दीक्षित याची पहिली पत्नी मयुरी उपाध्याय हिच्यासोबत घटस्फोट झाला. 2019 पासून दोघे विभक्त राहत होते. आता गायकाने 34 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत दुसरा संसार थाटला आहे. रघू दीक्षितचं लग्न गायिका वरिजाश्री वेणुगोपालशी झालं आहं. रघू 50 वर्षांचा आहे, तर वरिजाश्री त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. वरिजाश्री एक गायिका आणि संगीत शिक्षिका आहे. रघू आणि वरिजाश्री यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाचा एक फोटो आहे. दोघेही एका झोक्यावर बसून हसत आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिलं की, “आपल्या वडीलधाऱ्या, कुटुंबियांच्या आणि प्रियजनांच्या आनंद आणि पाठिंब्याच्या आशीर्वादाने या नवीन प्रवासाला सुरुवात करताना आनंद होत आहे.” सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, रघू दीक्षित आणि वरिजाश्री यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल काहीही कळलेलं नाही. पण रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, दोघांचं लग्न 14 ऑक्टोबर रोजी झालं आहे. रघु-वरिजाश्रीच्या लग्नाला अभिनेत्री यमुना श्रीनिधीसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
रघू दीक्षित याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं ढालं तर, त्याने 2005 मध्ये कोरिओग्राफर मयुरी उपाध्याय हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये रघू आणि मयुरी यांचा घटस्फोट झाला. 2016 पासूनच दोघांनी विभक्त राहण्यास सुरुवात केलेली. याचदरम्यान, गायिका श्रीपदा हिने रघू याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. तेव्हा मयुरी हिने देखील पूर्व पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
रघू दीक्षितवर लैंगिक छळाचा आरोप
रघु दीक्षितवर गंभीर आरोप झालेले, ज्यासाठी त्याने माफी देखली मागितली होती, गायिका चिन्मयी श्रीपादाने ट्विटरवर अज्ञात महिलांचे आरोप शेअर केले, ज्यात दीक्षितवर स्टुडिओमध्ये लैंगिक छळाचा आरोप करण्यात आलेला. एका महिलेने आरोप केल्यानुसार, रेकॉर्डिंगनंतर, दीक्षितने तिला स्वतःकडे ओढलं आणि चेकवर सही करताना तिला किस करण्यास सांगितलं, त्यानंतर ती रडत पळून गेली.
