या मंदिरात जोडपी विभक्त होतात, सहाशे वर्षांहून पुरातन सोडचिट्टी मंदिर, काय विशेष आहे या मंदिरात..

मंदिरात नवस करायला जोडपी येत असतात. परंतू एका अशा मंदिराबाबत तुम्हाला सांगितलं की जेथं घटस्फोट झाला की लोक येतात तर तुम्हाला आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही.

या मंदिरात जोडपी विभक्त होतात, सहाशे वर्षांहून पुरातन सोडचिट्टी मंदिर, काय विशेष आहे या मंदिरात..
divorce temple
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 17, 2023 | 1:10 PM

टोकीयो : मंदिरात दोन जीवाचं मिलन होते. देवाच्या साक्षीने लग्नं होत असतात. परंतू एका मंदिराचा जोडप्यांच्या विलग होण्याशी काही संबंध आहे असे कधी ऐकले आहे का ? होय असे एक मंदिर ( Temple ) आहे ज्यात पती आणि पत्नीचे मन संसारात रमत नसले तर घटस्फोटाचे चक्क अधिकृत प्रमाणपत्र ( certificate ) दिले जाते. तलाक दिला जातो, डिवोर्स होतो म्हणून या मंदिराला चक्क ‘डिवोर्स मंदिर’ ( Tokei-ji Divorce Temple )  म्हटले जाते. कुठे आहे हे आगळे वेगळे मंदिर पाहूयात…

मंदिरात दोन जीवांचं मिलन होतं, अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे मंदिरातील देवतेला नवस केले जातात. इच्छापूर्ण होत असल्याने त्या देवतेला इच्छापूर्ती देवता असे म्हटले जाते. या मंदिरांना दर्शनासाठी लांबलचक रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे नवस करायला जोडपी येत असतात. परंतू एका अशा मंदिराबाबत तुम्हाला सांगितलं की जेथं घटस्फोट झाला की लोक येतात तर तुम्हाला आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. हे अनोखे मंदिर अतिपूर्वेकडील देश म्हटला जाणारा जपानमध्ये आहे.

जपानच्या मात्सुगाओका टोकीजी मंदिराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आहे. हे मंदिर नव्या विचारांचे आणि सशक्तीकरणाचे एक केंद्र मानले जात आहे. परंतू या मंदिराला तलाक किंवा डीवोर्स ( घटस्फोट मंदिर ) म्हटले जाते. 1285 मध्ये एक बौद्ध उपासिका काकुसान शिदो-नी यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. त्याकाळात महिलांना पतीशी जर पटले नाही तर त्यांना वेगळे झाल्यानंतर समाजात फारसा आधार मिळत नव्हता. त्यामुळे अशा महिलांना आधार मिळावा म्हणून या मंदिराची निर्मिती झाली. त्यामुळे ज्या महिला आपल्या पतीबरोबर संसार करु इच्छीत नव्हती, किंवा तिला पतीने सोडचिट्टी दिलेली असायची किंवा घरगुती हिंसाचाराला सोमोरे जावे लागयाचे ती येथे येऊन राहू शकते.

लग्नापासून स्वातंत्र्य

त्याकाळाच लग्न मोडणे किंवा संसारातून मन न रमणे यासाठी महिलांनाच अधिक त्रास व्हायचा त्यामुळे महिलांना कोणताच आधार नसायचा. एकदा महिलेचे लग्न झाले की तिचे माहेरचे लोक तिला विसरुन जायचे. त्यामुळे या मंदिरातून टोकीजीने नांदायला तयार नसलेल्या किंवा पतीच्या अत्याचाराला कंटाळलेल्या, वेगळ्या झालेल्या महिलांना घटस्फोटाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. या प्रमाणपत्रामुळे त्यांना कायद्याने स्वातंत्र्य मिळाले.