Booked a Whole Train : अख्खी ट्रेन बुक करून तरुणांनी केली धम्माल, जयपूरमधला ‘हा’ Viral video पाहाच

Booked a Whole Train : अख्खी ट्रेन बुक करून तरुणांनी केली धम्माल, जयपूरमधला 'हा' Viral video पाहाच
पूर्ण मेट्रो ट्रेन बुक करून केली धमाल
Image Credit source: Youtube

Booked a Whole Train : एका मुलाने चक्क संपूर्ण मेट्रो (Metro) ट्रेन (Train) बुक केल्याची अनोखी घटना घडली आहे. प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये अर्धा डझन मित्रांसोबत खूप मजा केली, आपापसात अनेक खेळ ते खेळताना दिसले आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला.

प्रदीप गरड

|

Mar 21, 2022 | 4:26 PM

Booked a Whole Train : एका तरुणाने चक्क संपूर्ण मेट्रो (Metro) ट्रेन (Train) बुक केल्याची अनोखी घटना घडली आहे. प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये अर्धा डझन मित्रांसोबत खूप मजा केली, आपापसात अनेक खेळ ते खेळताना दिसले आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला. हा व्हिडिओ ‘क्रेझी एक्सवायझेड’ (Crazy XYZ) नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमित नावाचा मुलगा सांगतो, की त्याने जयपूर मेट्रोची संपूर्ण ट्रेन बुक केली आहे. व्हिडिओमध्ये प्रथम तो आतील साफसफाईच्या शेडमध्ये प्रवास करण्यापूर्वी ट्रेन साफ ​​करताना दिसत आहे. त्यानंतर मेट्रो केबिनचे आतील दृश्यही दाखवण्यात आले, ज्यामध्ये अनेक वेगवेगळी बटणे दिसत होती. यानंतर अमितने ड्रायव्हरला गाडी पुढे-मागे दाखवायला सांगितली आणि तसाच प्रकार घडला.

ट्रेनमध्ये करतात धमाल

रात्री 10 वाजता ट्रेन रिकाम्या प्लॅटफॉर्मवर आली. अमित त्याच्या मित्रांसोबत ट्रेनमध्ये चढला. यानंतर प्रवास सुरू होतो. व्हिडिओमध्ये अमितने संपूर्ण ट्रेनमध्ये फिरून रिकामी ट्रेन दाखवली आहे. ट्रेन सुरू झाल्यानंतर पहिले स्थानक मानसरोवर येते. पण ट्रेन न थांबता पुढे जाते. यानंतर ट्रेनमध्ये मस्ती सुरू होते. अमित मित्रांसोबत जमिनीवर बसला. ते लोक एक खेळ खेळू लागतात. ट्रेनही मध्यभागी अशा ठिकाणी थांबते, जिथे सर्वजण वॉशरूमसाठी उतरतात. ट्रेनमध्ये परत येताना या लोकांना बंद डब्यात जेवणही दिले जाते आणि ते लोक जमिनीवर बसून जेवताना दिसतात. काही लोक जेवल्यानंतर विश्रांती घेतात. इतर मित्र त्यांच्यावर खेळण्यांच्या बंदुकांनी हल्ला करतात.

‘तुम्ही आकाशातून पैशांचा पाऊसही पाडू शकता’

बराच वेळ सर्व मित्र खेळण्यांच्या बंदुकांनी खेळतात. मग ते डान्स करतात आणि एकमेकांवर पैसेही उडवतात. पुढे लेझी रिडरचा खेळही खेळला जातो. ही मजा रात्री एक वाजेपर्यंत चालते. त्यानंतर व्हिडिओ संपवत अमित म्हणतो, की आता फक्त एक छोटा प्रवास बाकी आहे. या व्हिडिओवर लोकांच्या मजेशीर कमेंट येत आहेत. एका यूझरने लिहिले, की xyz यांना असे वाटत आहे, की ही ट्रेन आपल्या वडिलांची आहे. दुसर्‍या यूझरने लिहिले, की क्रेझी आयडिया.. तिसऱ्या यूझरने लिहिले, की ड्रोनच्या मदतीने तुम्ही आकाशातून पैशांचा पाऊसही पाडू शकता.

आणखी वाचा :

Ferry Crash : ‘हे पाहणं खरंच खूप कठीण..’ भल्या मोठ्या जहाजाखाली आली छोटी नौका; अर्धा डझन ठार! पाहा, थरारक Video

Tiger Gava Clash : ह्या एका ‘झुंजी’पुढे सगळ्या ‘फाईल्स’ फिक्या, मेळघाटची ही ‘झूंड’ पाहिलात का?

Viral video : ‘जिवंत डायनासोर’ म्हणून परिचित असलेला ‘हा’ प्राणी आहे तरी कसा? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें