VIDEO | दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने रोमँटिक शैलीत गायले प्यार दीवाना होता है…, तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का ?

VIDEO | व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी एका कार्यक्रमात एक गाणं गात आहे, त्याचा आवाज इतका सुंदर आहे की, त्याने लोकांचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

VIDEO | दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने रोमँटिक शैलीत गायले प्यार दीवाना होता है..., तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का ?
Pyar Deewana Hota Hai
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 05, 2023 | 9:01 AM

दिल्ली : दिल्ली पोलिस (Delhi Police) अधिकाऱ्यांनी आपल्या देशाची राजधानी सुरक्षित ठेवली आहे. दिल्लीत कडक बंदोबस्त ठेवण्यात दिल्ली पोलिसांनी कसल्याची प्रकारची कसूर सोडलेला नाही. दिल्ली पोलिस किती टॅलेंट आहेत, हे आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. देशातल्या अनेक पोलिस खात्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळं टॅलेंट असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आलं आहे. सध्याच्या व्हिडीओने लोकांचं मनं जिंकलं आहे. सध्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. दिल्ली पोलिस अधिकारी (Delhi Police officer) रजत राठौर (Rajat Rathor) सोशल मीडियावर सेलिब्रिटी झाले आहेत. नुकतेचं त्यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि आशा पारेख (Asha Parekh) अभिनीत चित्रपट’कटी पतंग’ (Kati Patang) से किशोर कुमार (Kishore Kumar) यांचं सुपरहिट गीत ‘प्यार दीवाना होता है’ (Pyar Deewana Hota Hai) हे गाणं गायल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात दोन पोलिस कर्मचारी परफॉर्म करताना दिसत आहेत. एक कर्मचारी संगीत देत आहे. तर राठौड हे स्टेजवरती गिटार वाजवून भावनिक गाणं गातं आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 64 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 8 हजार लाइक्स सु्ध्दा मिळाले आहेत.

त्याने गुलाबी फुलांच्या इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिले, “प्यार दिवाना होता है.” एक वापरकर्ता म्हणाला, “हे खूप शांत आहे!” दुसऱ्याने लिहिले, स्पर्श केला. तिसरा म्हणाला, “तुमचा आवाज हृदयाचे प्रवेशद्वार आहे.”

एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “सर तुमचा आवाज अप्रतिम आहे, तुम्ही एक उत्तम कलाकार आहात, मी तुमचा मोठा फॅन आहे.” एकजण म्हणाला, “मला तुझा आवाज आवडतो.” अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी देखील दिले आहेत.