स्कुटरचा असा वापर? स्वतः बजाजने सुद्धा हा विचार केला नसणार!

काही लोक असे असतात की जे स्वत:च्या प्रयत्नाने काम सोपे करतात.

स्कुटरचा असा वापर? स्वतः बजाजने सुद्धा हा विचार केला नसणार!
bajaj scooterImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 5:23 PM

देसी जुगाडचा विचार केला तर भारतीय या बाबतीत तज्ज्ञ आहेत. रोज लोकं सोशल मीडियावर जुगाडचे व्हिडिओ अपलोड करतात आणि इंटरनेटवर व्हायरल करतात. लोक कौतुक करायला मागेपुढे पाहत नाहीत. उंच इमारतींवर विटा आणि वाळूची पोती घेऊन जाणाऱ्या मजुराला तुम्ही कधी पाहिलं आहे का? रोजंदारीवर काम केल्यानंतर त्यांना काही रुपये मिळतात, पण काही लोक असे असतात की जे स्वत:च्या प्रयत्नाने काम सोपे करतात. काही सेकंदात विटा वर पोहोचतात. एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत असून लोकांना हा व्हिडिओ पाहायला प्रचंड आवडत आहे.

एका व्यक्तीने जुन्या बजाज स्कूटरचा वापर केला आणि आता ही स्कुटर बहुमजली इमारतींवर विटा पोहचविण्याकरिता वापरली जाऊ शकते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक चाचा फक्त स्कूटरवर बसून अॅक्सिलेटर फिरवत आहे आणि विट आपोआपच छतावर चढत आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होत आहे. कष्ट न करता वीट उचलण्याची पद्धत आता अनेक ठिकाणी वापरली जात आहे, जिथे उंच इमारती आहेत. दोरी स्कूटरच्या इंजिनला बांधली जाते आणि अॅक्सिलेटर फिरवताच दोरीवरून वीट ओढली जाते.

@DhanValue नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खरं तर, रस्त्यावर गाडी चालवण्याव्यतिरिक्त या स्कूटरचा वापर अशा प्रकारे केला जाऊ शकतो, असा विचारही बजाजने कधी केला नसेल.”

यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. एका युझरने लिहिले की, “भारतात ही जुनी पद्धत आहे, पण लोक त्याचा अवलंब करत आहेत हे पाहून बरं वाटलं.”

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.