AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ‘हंगामी एकनाथ शिंदे म्हणून मी चालू शकतो का?’

एकनाथ शिंदे हे सध्या सूरतच्या हॉटेल ली मेरिडिअन मध्ये थांबले आहेत. काही आमदारही त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Eknath Shinde: 'हंगामी एकनाथ शिंदे म्हणून मी चालू शकतो का?'
eknath shinde-kshitij date Image Credit source: instagram
| Updated on: Jun 21, 2022 | 3:46 PM
Share

मुंबई: समाजात किंवा कुठल्याही क्षेत्रात एखादी मोठी घटना घडली की, लगेच त्याची सोशल मीडियावर (Social Media) प्रतिक्रिया उमटते. सोशल मीडिया सुद्धा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप अशी ही सोशल मीडियाची वेगवेगळी अंग आहेत. या माध्यमातून गोष्टी वेगाने व्हायरल होतात. आज एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले नसते, तरच नवलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर युझर्स वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतायत. काही गमतीशीर मीम्सही व्हायरल (Viral Mims) झाले आहेत. यात बागी 4 पासून अनेक गमतीशीर मीम्स आहेत. यात एक मीम लक्षवेधी ठरलाय. नुकताच दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर ‘धर्मवीर’ हा सिनेमा आला होता. या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तसंच क्षितीज दाते याने एकनाथ शिंदे यांचा रोल केला आहे. हा सिनेमा पाहून थिएटर बाहेर पडल्यानंतर प्रसाद ओकच्या अभिनयाची जितकी चर्चा होते. तितकाच एकनाथ शिंदेंचा रोल साकारणार क्षितीज दातेही आठवणीत राहतो.

हा मीम लक्षवेधी

आज एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर क्षितीज दातेची सुद्धा चर्चा सुरु आहे. त्याचा आणि एकनाथ शिंदेंचा फोटो असलेला एक गमतीशीर मीम व्हायरल झाला आहे. ‘हंगामी एकनाथ शिंदे म्हणून मी चालू शकतो का?’ असा मेसेज त्या फोटोवर आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सूरतच्या हॉटेल ली मेरिडिअन मध्ये थांबले आहेत. काही आमदारही त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याच्या राजकारणात पुढे काय होतं? ते लवकरच समजेल. पण सगळ्या मीम्समध्ये एकनाथ शिंदे आणि क्षितिज दातेचा हा मीम लक्षवेधी ठरला आहे.

कोण आहे क्षितीज दाते

धर्मवीर आधी क्षितीज दाते ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आला. क्षितिज आणि रुचा यांनी ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. आता आषाढी वारी निमित्त नवीन कार्यक्रम ‘हरी मुख म्हणा’मध्ये क्षितिज झळकणार आहे, सरसेनापती हंबीररावमध्ये पण त्याने काम केलंय. मागच्यावर्षी अभिनेत्री रुचा आपटेसोबत त्याने लॉकडाउनच्या काळात लग्न केलं. रुचाने दिल दोस्ती दुनियादारी, तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.