‘बटर चिकन गोलगप्पा’ची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून लोक म्हणाले – ‘हा अपमान आहे…’

हे फोटो ट्विटर युजर arAarKiBolboBolo ने शेअर केले आहेत. ज्यासोबत त्यानं कॅप्शन लिहिलं, 'आयुष्यात याची गरज नाही.' (Discussion of 'Butter Chicken Golgappa' on social media, people saw the photo and said - 'This is an insult ...')

'बटर चिकन गोलगप्पा'ची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून लोक म्हणाले - 'हा अपमान आहे...'

मुंबई : अन्नाबद्दल क्रिएटीव्ह असणे ही चांगली गोष्ट आहे. पण ही क्रिएटीव्ह डिश आणखी चांगली बनवण्यासाठी असावी, खराब करण्यासाठी नाही! कोरोना काळापासून लोक अन्नासंदर्भात विविध प्रयोग करत आहेत. जसे कोणी आइस्क्रीम समोसे बनवत आहे, तर कोणी बिर्याणी रसगुल्लाचा आस्वाद घेत आहे. आता या भागात, आणखी एक डिश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून लोकांना हसायला येत आहे.

आम्ही ज्या डिशबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे ‘बटर चिकन गोलगप्पा’. या डिशचे फोटो पाहून लोकांनी खूप ट्रोल केले आहेत. कारण एक काळ होता जेव्हा लोक गोलगप्पासाठी आंबट, गोड आणि तिखट पाणी निवडायचे. पण आता काही लोक मॅगी गोलगप्पा आणि बटर चिकन गोल गप्पा अशा गोष्टी खात आहेत.

हे फोटो ट्विटर युजर arAarKiBolboBolo ने शेअर केले आहेत. ज्यासोबत त्यानं कॅप्शन लिहिलं, ‘आयुष्यात याची गरज नाही.’ बातमी लिहेपर्यंत या फोटोला दोनशेहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यासोबतच अनेकांनी या डिशवर नाराजी व्यक्त केली आहे.

या फोटोवर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिलं, ‘हा गोलगप्पा आणि बटर चिकन या दोघांचा अपमान आहे.’ तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले,’असे लोक कोठून येतात.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘हे फोटो पाहणे हे घृणास्पद आहे. ‘या व्यतिरिक्त, इतर अनेक वापरकर्त्यांना ही डिश पाहून राग येत आहे.

संबंधित बातम्या

Video: ‘स्प्लेंडर’चा ‘ब्लेंडर’ म्हणून वापर, भुईमूग मुळापासून वेगळा करण्यासाठी बळीराजाचा अनोखा जुगाड

Video: ‘मणिके मगे हिते’ चं बासरी व्हर्जन ऐकलंय? नेटकऱ्यांकडून बासरी व्हर्जनला तुफान प्रतिसाद

Video: डान्स करणाऱ्या भावाने, अशी काही उडी मारली की लग्नाचा मांडवच फाडला, व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI