VIDEO : वर्षभरात कोरोना झाला नाही म्हणून सुपरमॅन समजू नका, मुंबईतील डॉक्टरचं कळकळीचं आवाहन

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका महिला डॉक्टराचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंबईतील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना महिला डॉक्टरच्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याचं बघायला मिळतंय (Doctor crying during telling about Mumbai corona situation).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:21 PM, 21 Apr 2021
VIDEO : वर्षभरात कोरोना झाला नाही म्हणून सुपरमॅन समजू नका, मुंबईतील डॉक्टरचं कळकळीचं आवाहन
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका महिला डॉक्टराचा व्हिडीओ व्हायरल होतोय

मुंबई : राज्यासह देशावर कोरोनाचं भयानक संकट (Corona Pandemic) ओढावलं आहे. मुंबईत तर फार भयानक संकट आहे. सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका महिला डॉक्टराचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंबईतील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना महिला डॉक्टरच्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याचं बघायला मिळतंय. डॉक्टर जीव ओतून लोकांना काळजी घेण्याचं, तसेच काही आठवडे घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे. याशिवाय वर्षभरात कोरोना झाला नाही म्हणून स्वत:ला सुपरमॅन समजू नका, असंही डॉक्टर म्हणताना दिसत आहे (Doctor crying during telling about Mumbai corona situation).

महिला डॉक्टर व्हिडीओत नेमकं काय म्हणाली ते जसंच्या तसं

“खूप साऱ्या डॉक्टरांप्रमाणे मी देखील त्रस्त आहे. त्यामुळे मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छिते. मी या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्ही सुरक्षित राहिलात तर मला बरं वाटेल” (Doctor crying during telling about Mumbai corona situation)

‘मुंबईतील परिस्थिती फार भयानक’

“मुंबईतील परिस्थिती फार भयानक आहे. आता तर हळूहळू अनेक शहरांमधील तसेच गावांमधील परिस्थिती वाईट होत चालली आहे. मुंबईची परिस्थितीत इतकी वाईट आहे की, रुग्णालयांमध्ये बेड्स नाहीत. आयसीयू बेड्स वेटिंगवर आहेत. मला इतकं लाचार फिल कधीच झालं नव्हतं. आता तर आम्हाला रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरसह त्यांच्या घरातच उपचार करावं लागत आहे. ही परिस्थिती बरी नाही”

‘वर्षभरात कोरोना नाही झाला तर तुम्ही सुपरहिरो आहात, असं समजू नका’

“त्यामुळे मी विनंती करते, कृपया तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला एक वर्ष कोरोना नाही झाला तर तुम्ही सुपरहिरो आहात असं समजू नका. तुम्हाला आतापर्यंत कोरोना नाही झाला म्हणजे तुमची रोगप्रतिकार क्षमता जास्त ताकदवान आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तसा गैरसमज आहे. 35 वर्षीय अनेक तरुण व्हेटिंलेटरवर आहेत. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करतोय. पण आम्ही हतबल होतोय. आम्ही त्यांना वाचवू शकत नाही आहोत. अशा परिस्थितीत कुणीही येऊ नये, अशी इच्छा आहे”

‘कोरोना प्रत्येक ठिकाणी अवतीभोवती’

“प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. सध्या कोरोना तुमच्या अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही घरातून बाहेर निघाल तेव्हा मास्क वापरा. एकदा करोना होऊन गेलाय तर पुन्हा कोरोना होणार नाही, असं नाही. तुम्हाला पुन्हा देखील कोरोना होऊ शकतो.”

‘ताप आला तर पॅनिक होऊ नका’

“जर तुम्हाला ताप आला तर पॅनिक होऊ नये. लगेच रुग्णालयात दाखल होऊ नका. सध्या अनेक रुग्णालयांमध्ये जे स्टेबल रुग्ण आहेत ते दाखल होत आहेत. तर ज्या रुग्णांना खरच दाखल होण्याची गरज आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे बेड्स शिल्लक नाहीत. त्यामुळे आम्ही लोकांना घरी ऑक्सिजन पुरवून उपचार देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही असं कधीच केलं नव्हतं.”

‘कोरोनाची लस घ्या’

“तुम्ही कोणत्याही कारणास्तव लस घेतली नसेल लवकर घ्या. ज्या लोकांनी दोन वेळा लसी घेतल्या आहेत त्या लोकांमध्ये जास्त लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळी कोरोना लस घेणं जास्त जरुरीचं आहे. काही आठवड्यांसाठी घरीच राहा. सध्या डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांनाही बेड्स मिळत नाही आहेत. तिसऱ्या लाटेचा विचार नंतर करु. ती यायला नकोच. पण त्याआधी या दुसऱ्या लाटेशी आपल्याला सामना करायचा आहे”

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : महाराष्ट्रात 22 एप्रिलपासून कडक निर्बंध, कोणत्या वाहतुकीला परवानगी? वाचा संपूर्ण नियमावली