Corona Cases and Lockdown News LIVE : मोठी बातमी ! महाराष्ट्रात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 22:14 PM, 21 Apr 2021
Corona Cases and Lockdown News LIVE : मोठी बातमी ! महाराष्ट्रात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर
Maharashtra-Lockdown

राज्य सरकारकडून महाराष्ट्रात लॉकडाऊन संदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 21 Apr 2021 22:03 PM (IST)

  महाराष्ट्रात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर

  राज्य सरकारकडून महाराष्ट्रात लॉकडाऊन संदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.

  नवी नियमावली नेमकी काय?

  लोकल रेल्वे प्रवास केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे

  सरकारी कार्यालयात फक्त 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम होणार
  खासगी कार्यालयातही 5 कर्मचारी किंवा अधिकाधिक 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक
  लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी, 2 तासांची वेळमर्यादा, नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड
  खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड

  राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

  1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.

  2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

  3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

  सविस्तर बातमी वाचा :

  लाईव्ह बातमी बघा :

 • 21 Apr 2021 20:41 PM (IST)

  लॉकडाऊन संदर्भात अध्यादेश मुख्य सचिवांच्या मार्फत जाहीर होणार

  मुंबई : राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी करोना संक्रमणाचा प्रसार कमी झालेला नाही. करोना रुग्णवाढ कायम असून, मृतांची संख्या वाढत असल्यानं काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक लॉकडाउनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाउन शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार काय करणार याकडे लक्ष लागलं होतं. पण, राज्यात कडक लॉकडाउन लागणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या

  लॉकडाउन संदर्भात जनतेशी संवाद साधून त्याबद्दल भूमिका मांडतील असं मंत्रिमंडळ बैठकीत ज्येष्ठ मंत्र्यांनी जाहीर केलं होतं मात्र नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी आजचा फेसबुक संवाद रद्द केल्यान. संपूर्ण लॉक डाउन संदर्भात अध्यादेश मुख्य सचिवांच्या मार्फत जाहीर होईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. हा अध्यादेश राज्य सरकार कधी जाहीर करतं तसेच राज्य सरकार लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी करतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 • 21 Apr 2021 20:37 PM (IST)

  वसई-विरारमध्ये दिवसभरात 858 नवे कोरोनाबाधित

  वसई-विरार कोरोना अपडेट :

  गेल्या 24 तासात 858 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर आज दिवसभरात 04 जणांचा मृत्यू, तसेच आज 432 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

  वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 46,567

  कोरोनामुक्त झालेली रुग्ण संख्या – 36,129

  आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या – 986

  कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या – 9452

 • 21 Apr 2021 19:59 PM (IST)

  जालना जिल्ह्यात 17 रुग्णांचा मृत्यू, 796 नवे कोरोनाबाधित

  जालना कोरोना अपडेट
  ★२४ तासात १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू.
  ★२४ तासात कोरोनाचे ७९६ नवे रुग्ण.
  ★जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३९ हजार ६५० वर.
  ◆आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६४७ रुग्णांचा मृत्यू.

 • 21 Apr 2021 19:58 PM (IST)

  पुणे शहरातही ऑक्सिजनचा तुटवडा, उद्या सकाळपर्यंत पुरेल इतकंच ऑक्सिजन शिल्लक

  पुणे :

  पुणे शहरातही ऑक्सिजनचा तुटवडा, उद्या सकाळपर्यंत पुरेल इतकंच ऑक्सिजन शिल्लक

  महापौरांनी केली सर्व रुग्णालयातील ऑक्सिजनचे ऑडिट करण्याच्या सूचना

  शहरातील सर्व रुग्णालयाचं ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या आयुक्तांना केली सूचना

  पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा कायम

  – अनेक लहान हॉस्पिटलने रुग्णांना प्रवेश देणं केलं बंद
  – ऑक्सिजन अभावी अनेक लहान हॉस्पिटलचा निर्णय
  – रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष ओढवला जाऊ नये म्हणून लहान हॉस्पिटलकडून निर्णय
  – मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक लहान हॉस्पिटलने रुग्णांना स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय
  – ४० हून अधिक हॉस्पिटलने ही भूमिका घेतलीय
  – ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा नसल्यानं हॉस्पिटल प्रशासन हतबल

 • 21 Apr 2021 19:57 PM (IST)

  हिंगोलीत सिव्हिल हॉस्पिटला काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा

  हिंगोली-

  सिव्हिल हॉस्पिटला काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा

  ऑक्सिजन मिळवण्यासाठी जिल्हाअधिकाऱ्यांसह आरोग्य विभाचे प्रयत्न सुरू

  चाकण, विशाखापट्टणम येथे गाड्या पाठवल्या असल्याची आरोग्य विभागाची माहिती

  वसमत येथील कोविड सेंटर चा कालच संपला ऑक्सिजन पर्याय म्हणून डीयुरा सिलेंडर लावले

 • 21 Apr 2021 19:18 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 629 नवे रुग्ण

  गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

  आज वाढलेले रुग्ण – 629
  आज झालेले मृत्यू – 14
  आज बरे झालेले – 745

  तालुका नुसार रुग्ण संख्या

  गोंदिया————–355
  तिरोडा————–73
  गोरेगाव————–11
  आमगाव————– 33
  सालेकसा————- 14
  देवरी—————— 53
  सडक अर्जुनी ———– 30
  अर्जुनी मोरगाव——– 52
  इतर राज्य————–08

  एकूण रुग्ण – 27713
  एकूण मृत्यू – 401
  एकूण बरे झालेले – 20656
  एकूण उपचार घेत असलेले – 6656

 • 21 Apr 2021 19:17 PM (IST)

  अकोल्यात दिवसभरात 573 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  अकोला कोरोना अपडेट :

  आज दिवसभरात 573 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…

  2301 अहवाला पैकी 1728 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत…

  ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 35437 झाला आहे….

  आज दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला आहे….

  *कोरोनामुळे आतापर्यंत 592 जणांचा मृत्यू …

  आज दिवसभरात 131 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…

  *तर 29246 जणांनी कोरोनावर मात केली आहे….

  *उपचार घेत असलेले रुग्ण 5599 आहेत……

  *शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती…..

 • 21 Apr 2021 19:16 PM (IST)

  येवल्यात दिवसभरात 67 नवे कोरोनाबाधित

  येवला :- कोरोनाबाधित 67 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

  आतापर्यंत 128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  येवल्याताील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : 3283

  कोरोनावर 2606 जणांनी मात करत केली घरवापसी

  उर्वरित 549 जण उपचार घेत आहेत

 • 21 Apr 2021 19:13 PM (IST)

  चंद्रपुरात दिवसभरात 1577 नवे कोरोनाबाधित, 33 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

  चंद्रपूर: गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहा:कार, 4340 नमुने तपासणीतून 1577 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 33 मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 46446

  एकूण कोरोनामुक्त : 32602

  सक्रिय रुग्ण : 13173

  एकूण मृत्यू : 671

  एकूण नमूने तपासणी : 341404

 • 21 Apr 2021 18:47 PM (IST)

  यवतमाळमध्ये दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू, तर 929 नवे कोरोनाबाधित

  यवतमाळ : 

  यवतमाळमध्ये आज 929 जण पॉझिटिव्ह, 39 जणांचा मृत्यू
  एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या – 43236
  जिल्ह्यात एकूण मृत्यू – 991
  जिल्याचा पॉझिटिव्ह दर – 11.96

  मृत्यू दर – 2.29

 • 21 Apr 2021 18:27 PM (IST)

  वाशिममध्ये एकाच दिवशी आढळले 322 नवे रुग्ण , 6 जणांचा मृत्यू

  वाशिम कोरोना अपडेट

  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

  दिवसभरात 6 रुग्णांचा  मृत्यू

  एकाच दिवशी आढळले 322 नवे रुग्ण

  आतापर्यंत 488 जणांना डिस्चार्ज

  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 23371

  सध्या अॅक्टिव्ह रुग्ण – 3955

  आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 19171

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 244

 • 21 Apr 2021 18:14 PM (IST)

  बेड न मिळाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या दारातच सोडला प्राण, नाशिकच्या चांदवड येथील घटना

  नाशिक : जिल्ह्यातील चांदवड येथे एका तरुणाने उपचारासाठी बेड न मिळाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडला आहेत.  मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णलायाच्या आवारात घडली आहे. आपल्या पतीला त्रास झाल्यानंतर या तरुणाच्या पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन आली होती. मात्र, बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला बाहेरच चेक केले होते. ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाल्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 • 21 Apr 2021 18:08 PM (IST)

  गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु

  पणजी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. या काळात कसिनो , रेस्टारंट आणि बार, सिनेमा हाँल 50 टक्के क्षमतेनं उघडी राहतील. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

 • 21 Apr 2021 18:05 PM (IST)

  महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नगरसेविका किरण दराडे यांची मागणी

  नाशिक – महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  शिवसेना नगरसेविका किरण दराडे यांची मागणी

  निष्क्रिय महापौरांमुळे यंत्रणेची अशी अवस्था

  महापौरांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी

 • 21 Apr 2021 18:00 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 98 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, तब्बल 7229 नवे रुग्ण

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात कोरोना मृत्यूचा तांडव सुरूच

  आज 98 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  7229 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर 7266 जणांनी कोरोना वर मात केल्याने काहीसा दिलासा

  एकूण रुग्ण संख्या – 343589

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 265457

  एकूण मृत्यू संख्या – 6575

 • 21 Apr 2021 16:29 PM (IST)

  मीरा भाईंदर रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, दोघांना अटक

  मीरा भाईंदर : मीरा रोडच्या नया नगर पोलिसांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 2 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी पांच इंजेक्शन हस्तगत केले आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्शन आरोपीने कुठून आणले याचा तपास पोलीस करत आहे.

  मीरा भाईंदर शहरात दोन व्यक्ती  इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून तब्बल 16 हजाराला विकत असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये पोलिसांनी 2 जणांना अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 • 21 Apr 2021 14:11 PM (IST)

  नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

  नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

  11 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 100 हुन अधिक ऑक्सिजनवर होते

  11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याचा अंदाज

  ३० जण मृत्यूच्या दाढेत

  शिवसेना महानगरप्रमुख यांचं पाहणी नंतर वक्तव्य

   

 • 21 Apr 2021 14:10 PM (IST)

  गोकुळ दूध संघाचे आणखी एक ठरावधारक कोरोनाचे बळी

  कोल्हापूर –

  गोकुळ दूध संघाचे आणखी एक ठरावधारक कोरोनाचे बळी

  कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील बुबनाळचे राजाराम हेगाण्णा यांचे निधन

  विकास सहकारी दूध संस्था मर्या. बुबनाळ संस्थेचे ठरावधारक

  ठरावधारका मधील कोरोनाचा आठवड्यातील दुसरा बळी

  चार दिवसांपूर्वी एका ठरावधकाराचा मृत्यू

  गोकुळ दूध संघासाठी 2 मे ला होणार आहे मतदान

 • 21 Apr 2021 13:52 PM (IST)

  कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या आणखी एक ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

  कोल्हापूर

  गोकुळ दूध संघाचे आणखी एक ठरावधारक कोरोनाचे बळी

  कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील बुबनाळचे राजाराम हेगाण्णा यांचे निधन

  विकास सहकारी दूध संस्था मर्या. बुबनाळ संस्थेचे ठरावधारक

  ठरावधारका मधील कोरोनाचा आठवड्यातील दुसरा बळी

  चार दिवसांपूर्वी एका ठरावधकाराचा मृत्यू

  गोकुळ दूध संघासाठी 2 मे ला होणार आहे मतदान

 • 21 Apr 2021 13:51 PM (IST)

  गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

 • 21 Apr 2021 13:13 PM (IST)

  डोंबिवलीत विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची कारवाई

  कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरु आहे.

  डोंबिवलीत घरडा सर्कल आणि शेलार नाका परिसरात पोलिसांनी नाका बंदी केली आहे.

  विना कारण फिरणा:या वाहन चालक आणि नागरीकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.

  आज सकाळपासून काही लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

  इतके आवाहन करुनदेखील काही लोक नियम पाळण्यास तयार नाहीत असे दिसून येत आहे.

 • 21 Apr 2021 13:12 PM (IST)

  मालेगावातील सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड तुटवडा, 103 रुग्णांची प्रशासनला चिंता

  मालेगाव:-सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड तुटवडा

  1 तास पुरेल एवढंच ऑक्सिजन शिल्लक

  वेळेवर सिलेंडर नाही मिळाले तर 103 रुग्णांचा काय होईल याची प्रशासनाला पडली चिंता.

  सामान्य रुग्णालयात 103 रुग्ण असून त्या पैकी 20 व्हेंटिलेटरवर तर 83 रुग्णांना लागतो ऑक्सिजन.

  रुग्णलायत रोज 230 जम्बो तर 6 ड्युरा सिलेंडर लागतात

 • 21 Apr 2021 13:11 PM (IST)

  जालन्यात गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

  जालना जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागत असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती,

  किराणा, भाजीपाला गृहउपयोगी वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सकाळ पासुनच गर्दी केली होती.

  या वेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत होते की,

  गर्दी करू नका. नागरिकांनी गर्दी केल्यामुळेही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचेही चित्र यावेळी दिसून आले.

 • 21 Apr 2021 12:49 PM (IST)

  नाशिक पालिकेच्या रुग्णालयात हाहा:कार, ऑक्सिजन टँक लीक

  नाशिक – पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात हाहाकार

  ऑक्सिजन टॅंक झाली लीक

  सर्वत्र गॅस पसरला

 • 21 Apr 2021 12:45 PM (IST)

  अहमदनगरात कोव्हिड-19 लसीकरणासाठी तुफान गर्दी, तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

  अहमदनगर

  कोव्हिड 19 लसीकरणासाठी तुफान गर्दी, तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

  जिल्हा रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण विद्यालयातील केंद्रावर मोठी गर्दी

  दरोरोज कोरोना रुग्ण वाढलाय मात्र तरीसुद्धा नागरीकांच दुर्लक्ष, अजूनही नागरिक नियम पळताना दिसत नाही

 • 21 Apr 2021 12:43 PM (IST)

  परळीतील ऑक्सिजन साठा संपला; रुग्णांचे प्रचंड हाल

  बीड – परळीतील ऑक्सिजन साठा संपला; रुग्णांचे प्रचंड हाल

  नवीन रुग्णांना ऍडमिट करून घेण्याची प्रक्रिया ठप्प; केवळ दाखल रुग्णावर उपचार सुरू

  प्रशासन देखील हतबल, गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी रुग्णांची धावाधाव

 • 21 Apr 2021 12:11 PM (IST)

  नांदेडमध्ये डॉक्टरवर जीवघेणा चाकू हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल

  नांदेड :
  नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा चाकू हल्ला

  मोठ्याने बोलू नका म्हटल्यावर रुग्णाच्या नातेवाईकाचा राग अनावर

  नातेवाईक थेट चाकू घेऊन डॉक्टरवर गेला धावून

  उपस्थितांनी अडवले म्हणून अनुचित प्रकार टळला

  भाऊसाहेब गायकवाड असे अटक आरोपीचे नाव त्याच्यावर गुन्हा दाखल

 • 21 Apr 2021 11:37 AM (IST)

  11 वाजल्यानंतरही पुण्याच्या महात्मा फुले मंडईत भाजी विक्री आणि इतर दुकानं सुरु

  पुणे

  11 वाजल्यानंतरही पुण्याच्या महात्मा फुले मंडईत भाजी विक्री आणि इतर दुकानं सुरु

  मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

  नियम लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांची पायमल्ली

 • 21 Apr 2021 10:18 AM (IST)

  अहमदनगरला अखेर 30 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला

  अहमदनगर –

  अखेर 30 मेट्रिक टन ऑक्सिजन नगर शहराला मिळाला

  काल ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता

  प्रशासनाच्या प्रयत्नाने रात्री मिळाला ऑक्सीजन

  निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी हॉस्पिटलला पहाटे 3 पर्यंत ऑक्सीजन वितरित

  कोरोना रुग्णांना मोठा दिलासा

 • 21 Apr 2021 10:09 AM (IST)

  कोरोनामुळे महाराष्ट्रात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा, आमदार आशिष देशमुखांचं पंतप्रधानांना पत्र

  – काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांचं पंतप्रधानांना पत्र

  – कोरोनामुळे महाराष्ट्रात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लावा

  – कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे

  – संविधानाच्या कलम ३६० अन्वये दोन महिने आणिबाणी लावाली

  – अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाने राज्यातील लोक रस्त्यावर मरतील

  – राज्यात ६० हजारपेक्षा जास्त कोरोना मृत्यू

 • 21 Apr 2021 10:07 AM (IST)

  सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, रुग्ण संख्या 1090 वर

  सांगली –

  जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

  कोरोनाची रुग्ण संख्या गेली 1090 वर

  दिवस भरात 19 जणांचा मृत्यू

  सांगली शहरा सह आटपाडी मिरज तालुक्यात रुग्ण संख्या जास्त

  1512 जणांची प्रकृती गंभीर

  1832 जणांची केली आर्टीपिसीआर टेस्ट त्यात 548 जण पोजीटीव्ह

  दिवसभरात 367 जण झाले कोरोना मुक्त

 • 21 Apr 2021 10:00 AM (IST)

  मुंबईच्या एलटीटी स्थानकात सतत 12 व्या दिवशी गावी जाण्यासाठी परप्रांतिय मजूरांची गर्दी

  – मुंबईच्या एलटीटी स्थानकात सतत 12 व्या दिवशी लाॅकडाऊनच्या भीतीपोटी गावी जाण्यासाठी परप्रांतिय मजूरांची गर्दी

  – भागलपूर, पवन आणि गोदान एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी मजूरांची गर्दी

  – गर्दी आणि रांगांमुळे सोशल डिस्टोंसिंगचा फज्जा

  – हाताला काम नसल्याने गावी जातोय अशी या प्रवाश्यांची भावना

  – गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून वाढवण्यात आली सुरक्षा, स्टेशन परिसरात रश्शी, ऊद्घोषणा आणि बॅरिकेटींग

  – नागरीकांना सोशल डिस्टेंसचं पालन करण्याच्या वारंवार सुचना

  – मजूर वर्ग विना तिकिटचं पोहोचले एलटीटी स्थानकात, कसंही करून गावी जायचंय या निर्धारातून हाजारोंच्या संख्येनं दाखल झाले मजूरांचे तांडे

 • 21 Apr 2021 08:52 AM (IST)

  नाशकात गेल्या 24 तासांत 5005 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  नाशिक -गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 5005 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  तर आतापर्यंत 24 तासात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू 57 जणांचा झाला मृत्यू

  मृत्यू संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली

  नाशिक ची परिस्थिती अत्यंत बिकट अनके रुग्णांना बेड मिळत नसल्याने होत आहेत मृत्यू

 • 21 Apr 2021 08:24 AM (IST)

  पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील आठवडाभरांपासून सातत्याने एक लाखांच्या आसपास

  पुणे :

  पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील आठवडाभरांपासून सातत्याने एक लाखांच्या आसपास स्थिर

  पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी

  गेल्या आठवडाभरात सक्रिय रुग्णांच्या संख्येत केवळ ४ हजार २७६ ने वाढ

  सोमवारच्या तुलनेत मंगळवारी या रुग्णांची संख्या १ हजार ६१ ने कमी

  यामुळे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतची एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ४६८

  जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने संभाव्य रुग्णसंख्येच्या अंदाजाच्या तुलनेत ही रुग्णसंख्या १७ हजार ८६३ ने कमी

  आरोग्य विभागाने १८ एप्रिललाच पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख १९ हजार ३३१ वर जाईल, असा वर्तवला होता अंदाज

 • 21 Apr 2021 08:20 AM (IST)

  औरंगाबादेत आता खाजगी रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत आता खाजगी रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट

  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आदेश

  रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची लूट होत असल्याच्या आरोपानंतर निर्णय

  कोरोनानंतर डिस्चार्ज अथवा मृत्यू झाला तरी बिल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याचे आदेश

  खाजगी रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाचे जिल्हाधिकारी करणार ऑडिट

  दोषी रुग्णालयांवर केली जाणार कडक कारवाई

  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केला महत्वाचा आदेश

 • 21 Apr 2021 08:19 AM (IST)

  सोलापुरात किराणा दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची अत्यल्प गर्दी

  सोलापूर –

  किराणा दुकानात खरेदीसाठी सुद्धा ग्राहकांची अत्यल्प गर्दी

  शहरातील विविध किराणा दुकानासमोर सोशल डिस्टंसिंग ग्राहक करत आहेत किराणा सामानांची खरेदी

  लॉकडाऊन काळातही ठराविक वेळेत किराणा दुकाने उघडणार हे नागरिकांना कळल्यामुळे गर्दी कमी होत असल्याची दुकानदारांची माहिती

 • 21 Apr 2021 08:19 AM (IST)

  औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात 1337 रुग्णांची नव्याने पडली भर

  औरंगाबाद –

  औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात 1337 रुग्णांची नव्याने पडली भर

  कोरोनाबधितांचा आकडा पोचला 1 लाख 11 हजार 830 वर

  आतापर्यंत 94523 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

  2217 रुग्णांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

  सध्या रुग्णालयात 15090 रुग्णांवर उपचार सुरू

 • 21 Apr 2021 07:40 AM (IST)

  औरंगाबादेत कोरोना मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला, एका दिवसात तब्बल 37 जणांचा मृत्यू

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत कोरोना मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला

  औरंगाबादेत एका दिवसात तब्बल 37 जणांचा झाला मृत्यू

  25 ते 35 वयोगटातील 4 रुग्णांचा मृतांत समावेश

  मृतांचा आकडा वाढल्यामुळे औरंगाबादेत खळबळ

  घाटी रुग्णालयात24 रुग्णांचा मृत्यू

  तर 13 रुग्णांचा इतर रुग्णालयात झाला मृत्यू

 • 21 Apr 2021 07:39 AM (IST)

  नवी मुंबईत डी-मार्ट बाहेर खरेदीसाठी रांगच रांग

  नवी मुंबई

  डी-मार्ट बाहेर खरेदीसाठी रांगच रांग

  7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूची दुकाने खुली

  11 नंतर दुकाने बंद होतील या भीतीने पहाटे पासूनच लोकांची गर्दी

  सोशल डिस्टन्स पाळावा यासाठी विशेष अंतरावर मार्क

 • 21 Apr 2021 07:23 AM (IST)

  रेमडेसीव्हीरच्या बाटलीत पाणी भरुन रुग्णांच्या नातेवाईकांना विक्री, नागपुरातील संतापजनक प्रकार

  – रेमडेसवीरच्या बाटलीत पाणी भरुन रुग्णांच्या नातेवाईकांना विक्री

  – नागपूर जिल्ह्यात घडला संतापजनक आणि धक्कादायक प्रकार

  – सक्करदरा पोलिसांनी दोन जणांना घेतलं ताब्यात

  – अभिलाष पेटकर आणि अनिकेत नंदेश्वर पोलीसांच्या ताब्यात

  – पोलिसांनी खाली बाटल्याही केल्या जप्त

  – जागरुक ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

 • 21 Apr 2021 07:12 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने पहिल्या लाटेतील सप्टेंबरचा रेकॅार्ड तोडला

  – नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने पहिल्या लाटेतील सप्टेंबरचा रेकॅार्ड तोडला

  – एप्रिल महिन्यात एकूण चाचण्यांच्या २६.४७ टक्के बाधीत

  – एप्रिलच्या २० दिवसांत वाढले १ लाख १० हजार ३२२ कोरोना रुग्ण

  – जिल्ह्यात एप्रिलच्या २० दिवसांत तब्बल १३७९ जणांचा मृत्यू

  – एप्रिल महिन्यात ४ लाख १६ हजारपेक्षा जास्त नमुण्यांची तपासणी

 • 21 Apr 2021 07:11 AM (IST)

  विना परवाना सुरु असलेल्या रुग्णालयावर गुन्हा दाखल, नवी मुंबई मनपा आरोग्य विभागाची कारवाई

  नवी मुंबई

  विना परवाना सुरु असलेल्या रुग्णालयावर गुन्हा दाखल

  नवी मुंबई मनपा आरोग्य विभागाची कारवाई

  घणसोली परिसरातील आर एल जी रुग्णालयावर केली कारवाई

  घणसोली से 7 मधील डी मार्ट जवळ अंबिका सोसायटीच्या तळ मजल्यावर रुग्णालय

  रुग्णालयात 12 पेक्षा अधिक रुग्ण असल्याने अद्याप सील केले नाही

  रुग्णांना इतर ठिकाणी स्थलांतरित केल्या नंतर होणार सील

  मनपा कार्यलय अधीक्षक संतोष शिलाम यांनी केली रबाळे पोलीस स्टेशनमध्ये रुग्णालया विरोधात तक्रार

  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अनेक स्थानिक रुग्णालय ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविडबाधितांवर उपचार सुरू होते

  याचाच फायदा घनसोलीतील आर एल जी रुग्णालयाने घेतला

  मात्र रुग्णालयाने मनपा आरोग्य विभागाकडून कुठलीही परवानगी घेतली नाही

  घणसोली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली म्हात्रे यांना याबाबत मिळाली माहिती

  मनपाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत प्रत्यक्ष केली पाहणी

 • 21 Apr 2021 07:04 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात कोरोनाचं मृत्यूतांडव सुरुच, 24 तासांत 91 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

  – नागपूर जिल्ह्यात कोरोनाचं मृत्यूतांडव सुरुच

  – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 91 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

  – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 6890 नव्या कोरोनाबाधीतांची नोंद

  – 24 तासांत 5504 कोरोना रुग्ण झाले कोरोनामुक्त

  – 24 तासांत 26080 जणांच्या कोरोना चाचण्या

  – जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली 71692 वर

 • 21 Apr 2021 07:02 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शनची प्रतीक्षा कायम

  – नागपूर जिल्ह्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शनची प्रतीक्षा कायम

  – सोमवारी रात्री जिल्ह्याला मिळाले केवळ ४२१३ इंजेक्शन

  – मंगळवारी रात्रीपर्यंत रेमडेसवीरची प्रतिक्षा होती कायम

  – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरंही सोमवारी रात्री ८ पर्यंत १० हजार रेमडेसवीर मिळाले नाही

  – सोमवारी रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत मिळाले ६० टक्के इंजेक्शन

  – रेमडेसवीर आणि ॲाक्सीजनच्या तुटवड्यामुळे नागपूरात मृत्यूची संख्या वाढली

 • 21 Apr 2021 06:49 AM (IST)

  नवी मुंबई महापालिका ऑक्सिजन निर्मिती करणार, मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी केली चाचपणी

  नवी मुंबई महापालिका ऑक्सिजन निर्मिती करणार

  मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी केली चाचपणी

  ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता मनपाकडून ऑक्सिजन निर्मिती

  ऑक्सिजन निर्मितीसाठी तज्ज्ञांचे घेतले सहकार्य

  पालिकेने द्रवरूप ऑक्सिजनच्या टाक्या बसवून साठवण करून ठेवण्याचा मार्ग शोधला

  नवी मुंबईत दिवसाला 200 ऑक्सिजन सिलेंडरची मागणी

  सध्या ऑक्सिजन वर 1.5 ते 2 करोड रुपये खर्च

  सहा महिन्यात आला 40 कोटी खर्च

  एका सिलेंडर मध्ये 175 क्यूबिक मीटरचा साठा

  त्यापैकी दिवसाला एका केंद्रावर 14 सिलेंडर लागतात

  तर लिक्विड गॅस सिलेंडर फायद्याचे

  त्यात लिक्विड गॅस सिलेंडर मध्ये 25 गॅस सिलेंडर बसतात

  एका व्यक्तीला 7.2 लिटर प्रति मिनिट इतका ऑक्सिजन लागतो

 • 21 Apr 2021 06:47 AM (IST)

  मुंबईत कोव्हिड रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

  मुंबई

  कोव्हिड रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

  केंद्र, राज्य, सरकारला माहिती सादर करण्याचे आदेश

  जनहित याचिकेची हायकोर्टाकडून गंभीर दखल

  मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विचारला जाब

  तसेच पुढील सुनावणीवेळी संपुर्ण माहिती सादर करण्याचे दिले आदेश

 • 21 Apr 2021 06:45 AM (IST)

  मुंबई महापालिका ऑक्सिजन बनवणार, तुटवडा पडू नये म्हणून महापालिकेचं पाऊल

  मुंबई

  महापालिका ऑक्सिजन बनवणार

  मुंबईत तुटवडा पडू नये म्हणून महापालिकेचं पाऊल

  जम्बो कोविड सेंटर, कुर्ला भाभा, गोवंडी शताब्दी, अश्या अन्या 12 ठिकाणी उभारणार प्लांट

 • 21 Apr 2021 06:43 AM (IST)

  मुंबईत नवी 61 लसीकरण केंद्रे

  मुंबई

  मुंबईत नवी 61 लसीकरण केंद्रे

  18 वर्षावरील सर्वांना लस देण्यासाठी पलिकेचे नियोजन

  तिन्ही रेल्वे लाइनवर स्टेशन परिसरात केंद्रें उभारणार

  अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती