Viral Video | कोरोनाबाधितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मेहनत, डॉक्टरांचे ‘हे’ प्रयत्न पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  (doctors dancing singing video)

Viral Video | कोरोनाबाधितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मेहनत, डॉक्टरांचे हे प्रयत्न पाहून तुम्हीही सलाम ठोकाल
DOCTOR VIRAL VIDEO
| Updated on: May 25, 2021 | 4:34 PM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. रोज लाखो कोरोनाग्रस्त (Corona Patient) नव्याने आढळत असून हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. जीवन आणि मरणाच्या या खेळामध्ये रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी कसून प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांवर यशस्वी उपचार करण्यासाठी डॉक्टर्स फक्त औषधींचाच नव्हे तर इतर साधनांचाही उपयोग करताना दिसतायत. रुग्णांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आरोग्य कर्मचारी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. त्यांचे हे प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. (doctors and hospital staff dancing and singing for cheer up Corona patient video goes viral)

व्हिडीओंमध्ये काय आहे ?

देश सध्या कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. रोज नवनवे रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतोय. मात्र, देशातील आरोग्य कर्मचारी न थकता आपली सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे हेच समर्पण सध्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये दिसत आहे. या व्हिडीओंमध्ये आरोग्य कर्मचारी रुग्णांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. हे कर्मचारी चित्रपटांतील गीतांवर थिरकतायत. तसेच अनेक कर्मचारी गाणेसुद्धा गात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक स्वास्थ जपण्यासाठी हे डॉक्टर्स भक्तीगीतांचासुद्धा उपयोग करतायत. यातील एका व्हिडीओमध्ये दिसतंय त्या प्रमाणे कोविड सेंटरमध्ये भक्तीगीत सुरु असल्याचा आवाज येत आहे. रुग्ण भक्तीगीत ऐकून देवाचा जप करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींमुळे कोविड सेंटरमधील वातावरण ताजे आणि उत्साहवर्धक असल्यासारखे वाटत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

हे व्हिडीओ anu lapsiwala नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला सलाम ठोकला आहे. तशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. अनेकांनी या कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांच्याप्रती कृतज्ञतासुद्धा व्यक्त केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या नृत्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओंना हजारो लोकांनी पाहिलं आहे.

इतर बातम्या :

Video : 4 समोसे 20 रुपयांचे की 40? व्हायरल व्हिडीओत चिमुरड्याचा युक्तिवाद तुम्हीच पाहा

भारतीय लष्करात बलशाली आहेत पॅरास्पेशल फोर्सेज; सर्जिकल स्ट्राईकमधून सिद्ध केलीय ताकद

VIDEO | कोरोना योद्ध्यांच्या स्मरणार्थ ITBP जवानाने वाजवलं ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

(doctors and hospital staff dancing and singing for cheer up Corona patient video goes viral)