भारतीय लष्करात बलशाली आहेत पॅरास्पेशल फोर्सेज; सर्जिकल स्ट्राईकमधून सिद्ध केलीय ताकद

या स्पेशल फोर्सेजची विविध प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून तर संपूर्ण लष्करामध्ये या फोर्सेजच्या जवानांची एक वेगळीच ऐट पाहायला मिळते. (The paramilitary forces are strong in the Indian Army; Proven strength from a surgical strike)

भारतीय लष्करात बलशाली आहेत पॅरास्पेशल फोर्सेज; सर्जिकल स्ट्राईकमधून सिद्ध केलीय ताकद
भारतीय लष्करात बलशाली आहेत पॅरास्पेशल फोर्सेज

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या पॅराट्रूपर्सचा जगात सर्वाधिक शक्तीशाली स्पेशल फोर्सेजमध्ये समावेश आहे. या स्पेशल फोर्सेजची इतकी खासियत आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसुद्धा या स्पेशल फोर्सेजशी जोडला गेला आहे. महेंद्रसिंग धोनी टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनेंट कर्नल म्हणून रुजू झाला आहे. धोनी याच पॅराफोर्सेजशी संबंधित आहे. याच स्पेशल फोर्सेजने 2016 मध्ये उरीच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत सर्जिकल स्ट्राईक केला होता. या स्पेशल फोर्सेजची विविध प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून तर संपूर्ण लष्करामध्ये या फोर्सेजच्या जवानांची एक वेगळीच ऐट पाहायला मिळते. जवानांना नुसते पाहूनही शत्रू गर्भगळीत व्हावा, इतकी या स्पेशल फोर्सेजची शक्ती आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. (The paramilitary forces are strong in the Indian Army; Proven strength from a surgical strike)

दुसऱ्या जागतिक महायुद्धाशी कनेक्शन

पॅरास्पेशल फोर्सेज पॅराशूट रेजीमेंटबरोबर जोडलेली आहे. या युनिटचे कनेक्शन अगदी दुसऱ्या जागतिक महायुद्धापर्यंतचे आहे. ऑक्टोबर 1941 मध्ये 50 पॅराशुट ब्रिगेडची स्थापना करण्यात आली होती. तसेच 9 पॅरा ब्रिगेड 1966 मध्ये तैयार करण्यात आली. याच नऊ पॅराशुटना कमांडो बटालियन म्हणून ओळखले जाते. लष्कराचे हे सर्वात जुने पॅरा युनिट आहे. सध्याच्या घडीला लष्करामध्ये फोर्सेजच्या 9 बटालियन्स आहेत.

1 पॅरा (एसएफ)
2 पॅरा (एसएफ)
3 पॅरा (एसएफ)
4 पॅरा (एसएफ)
9 पॅरा (एसएफ)
10 पॅरा (एसएफ)
11 पॅरा (एसएफ)
12 पॅरा (एसएफ)
21 पॅरा (एसएफ)

30 हजार फुटांवर छप्पर लावावे लागते

सन 1965 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले, त्यावेळी इंफेन्ट्री युनिट्सच्या जवानांना गार्ड्सच्या ब्रिगेडचे मेजर मेघ सिंहच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आले. या ग्रुपचा परफॉर्मन्स पाहून निर्णय घेण्यात आला की, स्पेशल फोर्सचे गठन स्वतंत्ररित्या केले जाईल. त्यानंतर एक खास बटालियन तयार करण्यात आली. परंतु, पॅराट्रूपिंगला कमांडो रणनीतीचा आंतरिक भाग ठेवण्यात आले. त्यानंतर याला पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रान्सफर केले गेले. जुलै 1966 मध्ये पॅराशूट रेजिमेंट देशातील सर्वात पहिली स्पेशल ऑपरेशन युनिट बनली. पॅरा कमांडोला 30,000 फुटांच्या उंचीवरून छप्पर लावण्यापासून ते 15 दिवसांचे मेहनतीचे प्रशिक्षण करायला लावले जाते.

आग्रा येथे होते ट्रेनिंग

पॅरा कमांडोजला आग्रा येथील पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण दिले जाते. पाचवेळा यशस्वी उडी घेतल्यानंतरच कोणत्याही कमांडोला क्वालिफाईड पॅरोट्रूपरचा बॅच प्रदान केला जात आहे. भिन्न टप्प्यांमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणामागे कमांडोंना शारिरीक आणि मानसिक रुपात मजबूत करणे हा उद्देश आहे. पॅरा कमांडोसाठी पॅराशूट हेच त्यांचे सर्वात मोठे शस्त्र असते. याचे वजन जवळपास 15 किलोग्रॅम इतके असते. एका रिझर्व्ह पॅराशूटचे वजन साधारण 5 किलोग्रॅम असते. तसेच पॅराशूटची किंमत एक लाखापासून दोन लाखापर्यंत असते. जवानांना रात्री जागे राहण्यापासून ते काहीही न खाता राहण्यापर्यंत प्रशिक्षण दिले जाते.

पॅरा कमांडोजची जबाबदारी

शत्रूची अगदी छोटीछोटी माहिती गोळा करण्यापासून ते महत्त्वाची ठिकाणे नष्ट करण्यापर्यंत ऑपरेशन्स यशस्वी करणे अशी व्यापक प्रमाणात पॅरा कमांडोजची जबाबदारी आहे. 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये याच स्पेशल फोर्सेजचे कमांडो सहभागी झाले होते. सध्या लष्कराचे हे युनिट कश्मीरच्या विविध प्रकारच्या काऊंटर-इनर्सेंजी ऑपरेशन्सचा भाग आहेत. या युनिटवर मुख्यत्वे स्पेशल ऑपरेशन्सची जबाबदारी असते. याआधी अशा स्पेशल ऑपरेशन्समध्ये शानदार कामगिरी करून पॅरा कमांडोजनी आपली ताकद सिद्ध केली आहे. (The paramilitary forces are strong in the Indian Army; Proven strength from a surgical strike)

इतर बातम्या

‘फ्लाईंग सिख’ Milkha Singh यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, कोरोनाविरुद्ध झुंज सुरु

Viral Fact | ब्लॅक फंगसवर तुरटी, हळद आणि सैंधव मीठ गुणकारी, जाणून घ्या काय आहे सत्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI