AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Fact | ब्लॅक फंगसवर तुरटी, हळद आणि सैंधव मीठ गुणकारी, जाणून घ्या काय आहे सत्य

सरकारी माहिती प्रेस इनफॉरमेशन ब्युरोने (PIB) या व्हिडिओचे विश्लेषण केले आहे आणि हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. (Alum, turmeric and sandhav salt cure black fungus, know what is true)

Viral Fact | ब्लॅक फंगसवर तुरटी, हळद आणि सैंधव मीठ गुणकारी, जाणून घ्या काय आहे सत्य
नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
| Updated on: May 24, 2021 | 11:41 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना महामारी आल्यापासून रोगप्रिकारशक्ती वाढविण्यापासून ते इन्फेक्शन रोखण्यासाठी उपाय सुचवणारे अनेक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना महामारीनंतर आता आणखी नवे संकट समोर उभे राहिले आहे, ते म्हणजे म्युकोर मायकोसिस. सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत आहे. यामध्ये फटकी, हळद, सैंधव मीठ आणि मोहरीचे तेलामुळे म्युकोर मायकोसिस बरा होतो, असा दावा करण्यात येत आहे. तथापि हा दावा खोटा असून फटकी आणि मोहरीच्या तेलाने काळ्या बुरशीवर उपचार होत असल्याचा कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Alum, turmeric and sandhav salt cure black fungus, know what is true)

सरकारी माहिती प्रेस इनफॉरमेशन ब्युरोने (PIB) या व्हिडिओचे विश्लेषण केले आहे आणि हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, हा दावा खोटा आहे. या उपचारासह काळ्या बुरशीच्या उपचारांचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. कृपया अशा गंभीर आरोग्य समस्येच्या उपचारांसाठी फक्त घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका.

कोरोना रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा धोका

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकोर मायकोसिस नावाचा रोग दिसून येतो. जे मधुमेह ग्रस्त आहेत अशा लोकांना म्युकोर मायकोसिसचा त्रास होत आहे. उपचारादरम्यान ज्या रुग्णांना स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत, त्यांच्यातही हा आजार गंभीर असल्याचे दिसून येते. हा रोग काळ्या बुरशीमुळे पसरतो. देशातील बर्‍याच राज्यात या आजाराचे बरेच रुग्ण आढळून येत आहेत ज्यात चेहर्‍याच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस, ताप, नाकातून रक्तस्त्राव होणे, नाकाच्या वरच्या भागावर काळे चट्टे येण्याची समस्या येतात.

दिल्लीत किती आहेत केसेस?

दिल्ली सरकारने चालवलेल्या एलएनजेपी आणि जीटीबी रूग्णालयात एका दिवसात काळ्या बुरशीच्या आणखी 36 केसेसची नोंद करण्यात आली आहे. शाहदरा येथील गुरु तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालयात 21 आणि लोक नायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात 15 रुग्ण आढळले आहेत. ताहिरपूर येथे असलेल्या दिल्ली सरकारने चालवलेल्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (आरजीएसएसएच) मध्ये काळ्या बुरशी किंवा म्युकोर मायकोसिसच्या उपचारांसाठी एक केंद्र आहे. आतापर्यंत आरजीएसएसएचमध्ये म्युकोर मायकोसिसच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

केरळमध्ये गंभीर परिस्थिती

केरळमध्ये रविवारी चार जणांचा म्युकोर मायकोसिसमुळे मृत्यू झाला, ज्याला सामान्यतः ब्लॅक फंगस संसर्ग म्हणून ओळखले जाते. मयत रुग्णांपैकी दोन जण एर्नाकुलम जिल्ह्यातील, तर दोन जण पठाणमथिट्टा जिल्ह्यातील रहिवासी होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या बुरशीने संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींवर सध्या एर्नाकुलम आणि कोट्टायम जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काळ्या बुरशीवर उपचार

देशातील म्युकोर मायकोसिस किंवा काळ्या बुरशीच्या वाढत्या घटना लक्षात घेता सरकारने एम्फोटेरिसिन-बीच्या 23,680 बाटल्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वितरीत केल्या आहेत. देशात आतापर्यंत काळ्या बुरशीचे 8,848 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे लक्षात घेऊन हे विशेष औषध वितरीत केले गेले आहे. अनेक राज्यांमध्ये म्युकोर मायकोसिसच्या वाढीचा आढावा घेतल्यानंतर एम्फोटेरिसिन-बीच्या एकूण 23,680 बाटल्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा येथे 75 टक्के औषध वितरीत केले गेले आहे. (Alum, turmeric and sandhav salt cure black fungus, know what is true)

इतर बातम्या

भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला

WhatsApp पुन्हा दोन पावलं मागे, Privacy Policy स्वीकारण्याची डेडलाईन पुढे ढकलली, ‘या’ युजर्सना संधी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.