भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला

कौटुंबिक वादातून माजी आमदाराच्या पत्नीने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला
Suicide Attempts

नवी मुंबई : भाजपच्या एका माजी आमदाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हे माजी आमदार लातूर जिल्ह्यातील उदगीरचे असल्याचं कळतंय. ही घटना 22 मे रोजी वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी सदर महिलेस आत्महत्येपासून परावृत्त केलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कौटुंबिक वादातून माजी आमदाराच्या पत्नीने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Former BJP MLA’s wife attempts suicide in Vashi Bay area)

वाशी खाडी पुलावर माजी आमदाराच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना 22 मे रोजी समोर आली. ब्रीजवर चढून एक महिला रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी सदरील महिलेल्या आत्महत्या करण्यापासून रोखलं. तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर ती महिला एका माजी आमदाराची पत्नी असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. वाशी पोलिसांनी त्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांना मानखुर्द पोलिसांकडे सुपूर्द केलं. कौटुंबिक वादातून तणाव निर्माण झाल्यामुळे संबंधित महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करणारी महिला ही माजी आमदाराची पत्नी आहे आणि ते माजी आमदार लातूरच्या उदगीरमधील असल्याची माहिती मिळतेय.

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचला, मात्र अनवधानाने तेच आईस्क्रिम खाललेल्या तिच्या मुलाचा-बहिणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न आणि हत्येप्रकरणी केरळ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कन्हानगडमध्ये ही घटना घडली होती. 25 वर्षीय वर्षाने 11 फेब्रुवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने उंदीर मारण्याचे औषध आईस्क्रिममध्ये घालून खाल्ले. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ती स्वतःच्या खोलीत गेली. मात्र विष मिसळलेले आईस्क्रिम तिने तसेच टेबलवर ठेवले होते. ते आईस्क्रिम तिचा पाच वर्षीय मुलगा अद्वैत आणि बहीण दृष्या यांच्या नजरेस पडले. दोघांनी आईस्क्रिम संपवलं. त्यानंतर हॉटेलमधून बिर्याणी मागवून तीही खाल्ली होती.

संबंधित बातम्या :

आधी दोन निष्पाप पोटच्या मुलांचा बळी घेतला, नंतर विहिरीत फेकलं, जन्मदात्या पित्याने निघृण कृत्य का केलं?

भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल, मित्रांकडे पैशाची मागणी

Former BJP MLA’s wife attempts suicide in Vashi Bay area

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI