VIDEO | कोरोना योद्ध्यांच्या स्मरणार्थ ITBP जवानाने वाजवलं ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

कोरोनाच्या या वाईट काळात या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेताना (Corona Warriors), बरेच लोक स्वतः या प्राणघातक विषाणूचा बळी ठरले.

VIDEO | कोरोना योद्ध्यांच्या स्मरणार्थ ITBP जवानाने वाजवलं ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ गाणं, व्हिडीओ व्हायरल
Viral Video

मुंबई : कोरोनाच्या या वाईट काळात या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेताना (Corona Warriors), बरेच लोक स्वतः या प्राणघातक विषाणूचा बळी ठरले. देशातील अनेक डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि इतर कोरोना वॉरियर्स लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ITBP च्या एका जवानाने त्या कोरोना वॉरियर्सचे विशेष पद्धतीने स्मरण केले आहे, ज्यांनी लोकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत: या जगाचा निरोप घेतला. या काळात लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आयटीबीपी जवानने ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ हे गाणे वाजवले (Constable Mujammal From ITBP Pays Tribute To All Fallen Corona Warriors On Saxophone).

ITBP जवानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जवानाचं नाव कॉन्स्टेबल मुजम्मल हक आहे. त्याने आपल्या सेक्सोफोनवरुन ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ चा अतिशय गोड धून काढली.

कोरोना युगात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील 300 पेक्षा अधिक सैनिक मरण पावले. या जवानाचा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. यात ते सेक्सोफोनद्वारे ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ गाणं वाजवत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युझरने म्हटले की, जेव्हाही कुठलं संकट येते तेव्हा आपल्या देशातील सैनिक मोठ्या शूरतेने त्याला सामोरे जातात. कोरोनाच्या काळात ज्यांनी आमची काळजी घेतान आपले प्राण गमावले ते नेहमीच लक्षात राहतील. त्याचवेळी दुसर्‍या युझरने लिहिले की आपल्या देशातील तरुण हा आपला खरा अभिमान आहे. या व्यतिरिक्त इतर युझर्सनेही अशा लोकांचे आभार मानले, जे या लढाईत वेगवेगळ्या प्रकारे लढले.

काही दिवसांपूर्वी आयटीबीपीच्या कॉन्स्टेबल राहुल खोसला याने कोरोना योद्धांना आपल्या मंडोलिनच्या धुनने सलामी दिली होती. त्यांनी ‘हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए’ या गाण्याची धून वाजवली होती. त्याचा व्हिडिओही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा आयटीबीपी जवान मुजम्मल हकने आपल्या कौशल्याने लोकांचे धैर्य वाढवून सर्व लोकांची मने जिंकली आहेत. त्याचा हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस पडत आहेत.

Constable Mujammal From ITBP Pays Tribute To All Fallen Corona Warriors On Saxophone

संबंधित बातम्या :

PHOTO | एक रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात मिळतील एक लाख रुपये, आपल्याकडेही आहेत का चांदीची नाणी?

VIDEO: अवघ्या 900 ग्रॅम वजनाचं बाळ, झोपवण्यासाठी डॉक्टरांनीच गायली अंगाई

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI