Viral video : आनंद पोटात माझ्या माईना! मालकिणीच्या हातातील वस्तू पाहून कुत्रा खूश, असं काही झालं की नेटकरीही अवाक

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियाव चांगलाच व्हायरल होतोय. हा कुत्रा त्याच्या मालकिणीच्या हातातील एक वस्तू पाहतो आणि तो इतक्या मोठं मोठ्याने उड्या मारून लागतो की मालकीन देखील परेशान होत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. या व्हिडीओला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

Viral video : आनंद पोटात माझ्या माईना! मालकिणीच्या हातातील वस्तू पाहून कुत्रा खूश, असं काही झालं की नेटकरीही अवाक
व्हायरल व्हिडीओ
Image Credit source: social
| Updated on: Apr 02, 2022 | 11:22 AM

मुंबई : अलीकडेच सोशल मीडियावर (social media) पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतायेत. विशेष म्हणजे नेटिझन्सला ते व्हिडीओ पहायला देखील आवडतं. घरात पाळलेली मांजर असो वा कुत्रा (dog), या दोन्ही पाळीव प्राण्यांचे लाड करण्यात घरातील छोट्यांसह वयोवृद्ध देखील कमी करत नाही. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विशेष म्हणजे कुत्र्यांशी संबंधित व्हिडीओ असतील तर ते अधिक प्रमाणात पाहिले जातात. अशातच एका कुत्र्याचा व्हिडीओ (dog video) सध्या सोशल मीडियाव व्हायरल होतोय. हा कुत्रा त्याच्या मालकिणीच्या हातातील एक वस्तू पाहतो आणि तो इतक्या मोठं मोठ्याने उड्या मारून लागतो की मालकीन देखील परेशान होत असल्याचं व्हिडीओमधून दिसून येतं. या व्हिडीओला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर व्हायर होणाऱ्या या कुत्र्याच्या व्हिडीओमध्ये तो आपल्या मालकिणीसोबत दिसतोय. या व्हिडीओमध्ये कुत्र्याची मालकिण त्याच्यासाठी अलमारीतून एक वस्तू बाहेर काढताना दिसत आहे. यावेळी हा कुत्रा मालकिणीच्या हातातील वस्तू पाहून इतका खूश होतो की तो उंच उड्या मारू लागतो. या व्हिडीओमध्ये हा कुत्रा इतका उंच उड्या मारताना दिसत आहे की बघणाऱ्यालाही आश्चर्य वाटेल. या क्लिपला पाहून नेटिझन्सला देखील आश्चर्य वाटल्याचं त्यांच्या कमेंट्सवरुन दिसत आहे. हा व्हिडीओ फेसबूकर, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय. याला नेटिझन्सकडून चांगलीच पसंती देखील मिळाली आहे. हा व्हिडीलो लोकांना चांगलाच आवडल्याचं दिसतंय.

पाहा कुत्र्याचा रंजक व्हिडीओ

व्हिडीओवर रंजक प्रतिक्रिया

या रंजक व्हिडीओला इन्टाग्रामवर pawficionados या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलंय. या व्हिडीओला बघून नेटिझन्स कमेट्स करतायेत. अनेक कमेंट्स या खूप रंजक आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीला पाहून पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होते. सोशल मीडियावरील व्हायर व्हिडीओवर एकाने लिहिलंय की, ‘या कुत्र्याला ऑलिम्पिकमध्ये पाठवावं.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की,’या कुत्र्याचं गोल्ड मेडल येणं तर फिक्स आहे.’ तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय की, मी तर हैरान झालोय, कोणता कुत्रा इतकी उंच उडी कशी मारू शकतो.’ अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

इतर बातम्या

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये अनेक ठिकणी शोभायात्रेचे आयोजन

Photo : नागपुरात Devendra Fadnavis यांनी उभारली गुढी, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दिल्या शुभेच्छा