Dogs video on Social media : अरे धमाल… कुत्र्यांची कमाल! हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल व्हॉलीबॉल असाच खेळतात

फुगा ही अशी वस्तू आहे की लहान मुले आणि प्राणीही ते पाहून खूप आनंदी होतात. त्याचे हृदय फुग्यासाठी धडधडू लागते. ही स्थिती फक्त लहान मुलांसाठीच आहे असे नाही. असे अनेक प्राणी आहेत ज्यांना फुगा पाहून त्याच्याशी खेळावेसे वाटते.

Dogs video on Social media : अरे धमाल... कुत्र्यांची कमाल! हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल व्हॉलीबॉल असाच खेळतात
कुत्रं
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 16, 2022 | 6:18 PM

Dogs video on Social media : कुत्रा हा खूप इमानदार प्राणी आहेत. तसाच तो मजेशिर ही. म्हणूनच हा अनेकांच्या घरात असतो. लोक त्याला जीव लावतात. काही पाळीव कुत्रे (Dog) त्यांच्या मालकांशी आणि घरातील इतर सदस्यांशी इतके चांगले जुळतात की ते त्यांच्या हालचाली कॉपी करतात. अनेकदा आपण व्हिडिओमध्ये (video viral) कुत्रे खेळताना पाहतो. इंटरनेटवर कुत्र्यांच्या मजेदार व्हिडिओंनी भरलेले असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुत्र्यांचा घोळका मोकळ्या मैदानात फुग्यासह व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत आपण एका कुत्र्यांच्या टीमला पाहू शकाल. जे गट करून मैदानात फुगे घेऊन खेळताना दिसत आहेत. तर व्हिडिओ @CreatureNature_ ने ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात टीमचा प्रत्येक कुत्रा प्रोफेशनल खेळाडूसारखा खेळताना दिसत होता. फुटबॉल, व्हॉलीबॉलसारखे शॉट मारण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. तर या व्हिडिओला काही तासांतच पाच हजारांहून अधिक अपव्होट्स मिळाले आहेत.

फुग्यांसह व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचा खेळ पहा

फुगा ही अशी वस्तू आहे की लहान मुले आणि प्राणीही ते पाहून खूप आनंदी होतात. त्याचे हृदय फुग्यासाठी धडधडू लागते. ही स्थिती फक्त लहान मुलांसाठीच आहे असे नाही. असे अनेक प्राणी आहेत ज्यांना फुगा पाहून त्याच्याशी खेळावेसे वाटते. असेच काहीशी याही व्हिडिओत तुम्हाला पहायला मिळेल. जिथे अनेक कुत्रे हे या फुग्याबरोबर खेळत आहेत. ते फुग्याबरोबर व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचा खेळ खेळण्याचा आनंद घेत आहेत.

@CreatureNature_ ने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आता पर्यंत 3.70 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 30 हजारांपेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. तर लोक आपली प्रतिक्रीया ही देत आहेत.