AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायपुसणी, टॉवेल,चमचे…बाली येथील हॉटेलचे साहित्य चोरताना सापडले भारतीय टुरिस्ट, VIDEO

इंडोनेशियातील बाली येथे एका भारतीय फॅमिलीच्या लाजीरवाण्या कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेक आऊट दरम्यान जेव्हा हॉटेलच्या स्टाफला संशय आला तेव्हा बॅग तपासली असता हा प्रकार उघड झाला.

पायपुसणी, टॉवेल,चमचे...बाली येथील हॉटेलचे साहित्य चोरताना सापडले भारतीय टुरिस्ट, VIDEO
BALI VIRAL VIDEO
| Updated on: Apr 22, 2026 | 8:59 PM
Share

इंडोनेशियातील बाली येथील एका भारतीय कुटुंबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लाजीरवाणी घटना चित्रित झाली आहे.एका कुटुंबाने हॉटेलमधून बाहेर पडताना आपल्या बॅगेतून हॉटेलमधील साहित्य चोरल्याचे उघड झाले आहे. या व्हिडीओ पाहून लोक भारताचे नाव बदनाम केले अशी टीका करत आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की चेक आऊट करताना हॉटेल स्टाफला जेव्हा संशय आला तेव्हा त्याने त्यांचे साहित्य तपासले. त्यांच्या बॅगेतून हॉटेलमधील टॉवेल, सजावटीचे सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तूच एवढंच काय तर पायपुसनी देखील सापडली आहे.

केव्हाचा आहे हा व्हिडीओ ?

बाली टाईम्सच्या बातमीनुसार ही घटना बालीच्या जियानगर जिल्ह्यातील उबुद स्थित असवारा रिसॉर्टची आहे. माहितीनुसार भारतीय पर्यटक १६ एप्रिलपासून या हॉटेलात उतरले होते. आणि त्यांना १९ एप्रिल रोजी चेक आऊट करायचे होते. घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा त्यांना चेक आऊट करायचे होते. आणि हॉटेल रुममध्ये साहित्य गायब झाल्याचे पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांच्या बॅगची झडती घेण्यात आली आणि त्यांची पोल खोल झाली.

जेव्हा भारतीय पर्यटकांच्या सामानाची झडती घेण्यात आली तेव्हा बॅगेच्या आतून एकामागोमाग एक हॉटेलचे साहित्या निघू लागले. या फॅमिलीला रंगेहात पकडण्यात आले तेव्हा या फॅमिलीने हॉटेलच्या व्यवस्थापकाची माफी मागितली. या साहित्याचे पैसे देण्याची तयारी दाखविली. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांनी हे पैसे देऊन मिटणारे प्रकरण नाही असे सुनावले.

येथे पाहा व्हिडीओ –

बॅगेतून काय-काय मिळाले ?

व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की हॉटेलच्या स्टाफने जेव्हा बॅगेची तपासणी केली तेव्हा त्यात हॉटेलचे टॉवेल, साबणाचे डिस्पेंसर, सजावटीचे शोपीस, हेअर ड्रायर तसेच अगदी डोअरमॅट,चमचे देखील सापडले.

पुढे काय झाले मग ?

जियानार पोलिसांच्या प्रवक्ते इप्तू आय गुस्ती नगुराह यांच्या मते या प्रकरणाला रिसॉर्टच्या मॅनेजमेंटपर्यंत पोहचवले होते. त्यांनी माहिती मिळताच पर्यटकांच्या चेक आऊटला काही वेळासाठी थांबवले. या टुरिस्ट विरोधात कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. हॉटेल, स्टाफ आणि फॅमिलीत आपसात सहमतीने हे प्रकरण मिटवण्यात आले आहे. फॅमिलीने सर्व साहित्य परत केले आहे. त्यामुळे कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

Follow Us
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.