AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना जगण्याची प्रेरणा देतात. यशस्वी होण्यासाठी काय करावं? याबद्दल चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयात.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 8:58 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं सार सांगितलं आहे. चाणक्य नीती ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपण यशस्वी व्हावं, मात्र यश ही एका दिवसामध्ये मिळणारी गोष्ट नाही. यश ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर आधी अपयश पचवायला शिका, या जगात असे अनेक जण असतात ज्यांना यशस्वी व्हायची इच्छा असते. त्यासाठी ते खूप कष्ट देखील करतात मात्र जर त्यामध्ये त्यांना अपयश आलं तर ते निराश होतात, आणि प्रयत्न सोडून देतात. हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असे तर तुम्हाला अपयश देखील पचवता आलं पाहिजे, त्यासाठी तुमच्याकडे संयम असणं गरजेचं असतं. अपयश आलं तर निराश होऊ नका, त्यातील योग्य तो धडा घ्या आणि पुन्हा कामाला लागा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच तीन चुका या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतात असं देखील चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आळस – चाणक्य म्हणता आळस हा तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आळशी आहे, तो आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला खरच यश मिळवायचं असेल तर सर्वात आधी आळस दूर करा आणि जोमाने कामाला लागा. तुमच्या अंगात जर आळस नसेल तर तुम्ही आर्धी लढाई तिथेच जिंकतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ज्ञान – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहज करू शकतात. त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, त्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नसताना थेट कामाला सुरुवात करू नका, तर त्या गोष्टीबद्दल आधी ज्ञान घ्या, तरच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल.

राग – चाणक्य म्हणतात लोक रागात नेहमी चुकीचा निर्णय घेतात, कारण ते त्यांच्या डोक्यावरील नियंत्रण गमावून बसलेले असतात. त्यामुळे कधीही राग येऊ देऊ नका, शांत राहा. कोणताही निर्णय मनावर पूर्ण नियंत्रण ठेवून घ्या.

भावनिक- चाणक्य म्हणतात जिथे आर्थिक व्यवहार आहेत, तिथे कधीही भावनिक होऊ नका, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत