नवरा मुलगा हवाय पण कोविशिल्डचेच डोस घेतलेला, लग्नाच्या जाहिरातीवरही लसीकरणाचा इफेक्ट

आता लग्नाच्या जाहिरातीतही लसीकरण घुसलेलं आहे आणि वधू पक्षाला तिनं जी लस घेतलेली आहे त्याच टाईपची लस घेतलेला वर हवा आहे. (Effect of vaccination on marriage advertisement Groom wanted but took the dose of Covishield)

नवरा मुलगा हवाय पण कोविशिल्डचेच डोस घेतलेला, लग्नाच्या जाहिरातीवरही लसीकरणाचा इफेक्ट
लग्नाची जाहिरात.....
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 2:17 PM

मुंबई : तुम्ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या लग्नाच्या जाहिराती आतापर्यंत पाहिलेल्या असतील. म्हणजे अमुक रंगाचा, ह्याच जातीचा, त्या कुळाचा, एवढ्या उंचीचा, एवढं तेवढं शिक्षण असलेला, पगाराचा, परदेशात सेटल असलेला वगैरे वगैरे पण कोविशिल्डचाच डोस घेतलेला नवरा मुलगा हवाय अशी जाहिरात तुम्ही वाचली तर काय म्हणाल? हसाल, कदाचित वेड्यातही काढाल. पण काहीही असो, वास्तव तर हेच आहे की, आता लग्नाच्या जाहिरातीतही लसीकरण घुसलेलं आहे आणि वधू पक्षाला तिनं जी लस घेतलेली आहे त्याच टाईपची लस घेतलेला वर हवा आहे. (Effect of vaccination on marriage advertisement Groom wanted but took the dose of Covishield)

काय आहे जाहिरातीत?

नरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…

एका इंग्रजी वर्तमान पत्रात ही जाहिरात प्रकाशित केली गेली आहे. 4 जून शुक्रवारी ती छापली गेली आहे. सध्या ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाली आहे. ह्या जाहिरात वधूपक्षानं दिलेली आहे. त्यात ते असं सांगतात, रोमन कॅथोलिक मुलगी आहे, तिची 24/5’4″ वय- उंची आहे. तिनं गणितात M.Sc केलेलं आहे. सेल्फ एम्पलॉईड आहे. आणि पुढं लिहिलंय, कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

अशा वधूला जो नवरा मुलगा हवाय तो कसा हवा तर असा: रोमन कॅथोलिक असावा, त्याचं वय 28 ते 30 वर्ष हवं. पदवीधर, स्वतंत्रवृत्तीचा, कुणावर अवलंबुन नसलेला, धैर्यवान, विनोदी, पुस्तकं वाचणारा असा असावा. त्याच्याच पुढच्या ओळीत लिहीलंय, की त्यानं कोविशिल्डचा डोस घेतलेला असावा आणि तेही दोन्ही. म्हणजेच वधूनं जसे कोविशिल्डचेच दोन डोस घेतलेले आहेत तसेच भविष्यातल्या नवऱ्या मुलानेही घ्यावेत.

(Effect of vaccination on marriage advertisement Groom wanted but took the dose of Covishield)

हे ही वाचा :

Viral Video | मित्र आले अन् भलतंच घडलं, थेट अंगावरचे कपडे फाडले, मंडपात नवरदेवाची चांगलीच फजिती

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ