AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Viral Photo: “बाबा, हा…ते फोटो तुझाय का रे?” शेम टू शेम एकनाथ शिंदे दिसणाऱ्या बाबा कांबळेंना अजितदादांचा थेट कॉल

Eknath Shinde Viral Photo: लोकांनी फोटो शेअर करत,एकनाथ शिंदेंनी कसा कसा प्रवास करत मुख्यमंत्रीपद गाठलंय हे त्या फोटोवर लिहीलंय. शेवटी हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की नेमकं त्या फोटोतली व्यक्ती आहे कोण याचा खुलासा केला गेला.

Eknath Shinde Viral Photo: बाबा, हा...ते फोटो तुझाय का रे? शेम टू शेम एकनाथ शिंदे दिसणाऱ्या बाबा कांबळेंना अजितदादांचा थेट कॉल
Ajit Pawar Phone Call To Baba KambleImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 28, 2022 | 2:44 PM
Share

पिंपरी चिंचवड: राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आणि महाविकासआघाडीचं (MahaVikasAghadi) सरकार कोसळलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे सुरुवातीच्या काळात रिक्षाचालक (Auto Driver) होते. मुख्यमंत्री झाल्यापासून हा मुद्दा वारंवार समोर येतोय. कधी कौतुकाच्या हेतूने तर कधी अजून कुठल्या हेतूने “एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला” असं बोललं जातंय. सध्या याच संदर्भात ट्विटरवर तुफान चालू आहे. झालंय असं की एकनाथ शिंदेंसारख्या दिसणाऱ्या एका इसमाचा फोटो चक्क एकनाथ शिंदेंचाच फोटो (Eknath Shinde Viral Photo) असल्याचं म्हणत ट्विटरवर व्हायरल केला जातोय. फोटो मध्ये एक रिक्षा आहे आणि त्या रिक्षाच्या बाजूला एक हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा दिसणारा माणूस उभा आहे. लोकं या फोटोला फसलीत…लोकांनी फोटो शेअर करत,एकनाथ शिंदेंनी कसा कसा प्रवास करत मुख्यमंत्रीपद गाठलंय हे त्या फोटोवर लिहीलंय. शेवटी हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की नेमकं त्या फोटोतली व्यक्ती आहे कोण याचा खुलासा केला गेला. फोटोतली व्यक्ती एकनाथ शिंदे नसून ती दुसरीच व्यक्ती असल्याचं समोर आलं. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्या व्यक्तीला फोन केला आणि ती ऑडीओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली.

“बाबा, हा…ते फोटो तुझाय का रे?”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रिक्षा जवळ उभारलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळेंचा असल्याच पुढे आलंय. सजवलेल्या रिक्षा समोर 1997 साली बाबा कांबळे यांचा चेहऱ्यावर दाढी असलेला फोटो समोर आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाबा कांबळे यांच्या चेहऱ्यातला साधर्म म्हणजे ‘दाढी’. म्हणूनच हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच आहे,अशी मिश्किल चर्चा काही समर्थकांनी घडवली बाबा कांबळेंना ह्या फोटो बाबतची माहिती स्वतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून तो फोटो तुमचा आहे की एकनाथ शिंदेचा आहे अशी विचारणा केली असल्याची मोबाईल संभाषण क्लिप सुद्धा समोर आली आहे.

 खुद्द कांबळेंनी या फोटोबद्दल सविस्तर माहिती दिली

अजितदादांनी थेट कांबळे यांना फोन केला. बाबा, तूच आहेस का रे? असा प्रश्न अजितदादांनी विचारला, त्यावर खुद्द कांबळेंनी या फोटोबद्दल सविस्तर माहिती दिली.सुरुवातीच्या काळात रिक्षाचालक म्हणून आपण काम केल्याची माहिती कांबळेंनी दिली. 1997 मध्ये श्रावण महिन्यात रिक्षा स्टॅंडवर रिक्षाची पूजा केली होती. त्यावेळी काढलेला फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.