आयो…आजीबाई का जवाब नहीं! लोकं म्हणे,” गुगलला मागे टाकलं”

आपल्याला सतत कुणी ना कुणी आत्मविश्वासाचा डोस देणारं लागतं. बरेचदा आपण दुसऱ्या लोकांना बघून सुद्धा शिकतो. त्यांना बघून आपला विश्वास वाढतो.

आयो...आजीबाई का जवाब नहीं! लोकं म्हणे, गुगलला मागे टाकलं
Elder lady speaks fluent english
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Sep 28, 2022 | 12:07 PM

इंग्रजी बोलताना काय वाट लागते ना जर आपलं इंग्रजी माध्यम नसेल तर? नुसतंच ऐकत आलोय इंग्रजी सोपं असतं. बोलायला लागलं की आपल्यालाच माहित आहे काय होतं ते. आपल्याला सतत कुणी ना कुणी आत्मविश्वासाचा डोस देणारं लागतं. बरेचदा आपण दुसऱ्या लोकांना बघून सुद्धा शिकतो. त्यांना बघून आपला विश्वास वाढतो. या आजी बघा, फाडफाड इंग्रजी बोलतायत. इंग्रजी पण असं बोलतायत की डायरेक्ट महात्मा गांधींबद्दल सांगतायत. एकदम आत्मविश्वासाने. ह्यांचा व्हिडीओ बघितलं की वाटतं. हो यार! इतकं पण अवघड नाहीये जितकं वाटतं…! या आजींचा व्हिडीओ आणि या आजी प्रचंड फेमस झाल्यात.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोणीतरी या आजीला महात्मा गांधींवरील निबंध इंग्रजीत पाठ करण्यास सांगताना दिसतंय.

व्हिडीओ जर नीट पाहिला तर आजी राजस्थानची रहिवासी वाटते. जशी आजी इंग्रजी बोलायला सुरु करते त्या इंग्रजी मध्ये राजस्थानी झलक असते. त्यावरूनच कळतं आजी राजस्थानच्या आहेत.

व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Yogesh Lata (@latayogesh79)

आजी न थांबता महात्मा गांधींवरील निबंध म्हणायला सुरुवात करतात. इतकं छान आजी इंग्रजीत बोलायला लागतात. आजी अनेक हिंदीचे शब्द आणि आकडेही बोलत होती. आजीचा विश्वास नेक्स्ट लेव्हलचा आहे. व्हिडीओ बघताना आपल्यालाही तो हवा हवासा वाटतो.

हा व्हिडिओ कुणीतरी रेकॉर्ड करून इंटरनेटवर पोस्ट करताच तो झपाट्याने व्हायरल झाला. अनेक ठिकाणी आजीने चुका केल्या, पण लोक त्यांचे कौतुक करण्यास मागेपुढे पाहत नव्हते. नेटकरी म्हणतायत, “आजीसमोर गुगलही फेल होत आहे.”

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें