वर्षानुवर्षे बंद होतं हॉटेल, दरवाजा उघडताच फुटला घाम! समोरच्या वस्तू पाहिल्या अन्…
वर्षानुवर्षे रिकामं पडलेलं ‘लव्ह हॉटेल’ (Love Hotel) नुकतंच एका अर्बन एक्सप्लोररने शोधून काढलं. या हॉटेलची खासियत अशी आहे की, ते बंद होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे, पण त्याच्या आत आजही सर्व काही जसंच्या तसं आहे.

शहरांमध्ये अशा अनेक इमारती असतात ज्या वर्षानुवर्षे खाली पडलेल्या असतात. त्या खाली असलण्यामागे देखील वेगवेगळी कारणं असू शकतात. कधी बिल्डर मधूनच पळून जातात तर कधी इललिगल असल्याचे समजते. त्यामुळे अशा इमारतींमध्ये शिरण्यास लोक टाळाटाळ करतात. पण एका अर्बन एक्सप्लोररने न घाबरता जपानमधील एका बंद पडलेल्या हॉटेलात प्रवेश केला. खोलीत ठेवलेल्या वस्तू पाहून तो थक्क झाला आणि मग त्याला समजलं की हे काही सामान्य हॉटेल नव्हतं, तर एक खास प्रकारचं हॉटेल होतं.
जपानमधील वर्षानुवर्षे रिकामं पडलेलं ‘लव्ह हॉटेल’ (Love Hotel) नुकतंच एका अर्बन एक्सप्लोररने शोधून काढलं. या हॉटेलची खासियत अशी आहे की, ते बंद होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे, पण त्याच्या आत आजही सर्व काही जसंच्या तसं आहे, मग ते स्पेसशिप-स्टाइलचे बेड असोत, शिंपल्याच्या आकाराचे बाथटब असोत किंवा प्रौढांसाठी बनवलेली जुनी खेळणी असोत.
वाचा: हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय? सरकार आणि जरांगेंमध्ये त्यावरुन झालेला वाद काय?
Exploring an Abandoned 1980’s Japanese Love Hotel w/ Themed Rooms byu/LordExplores inurbanexploration
लव्ह हॉटेल म्हणजे काय?
जपानमधील लव्ह हॉटेल हे असे शॉर्ट-स्टे हॉटेल्स आहेत, जे खासकरून जोडप्यांच्या गोपनीयतेच्या आणि जवळच्या क्षणांसाठी डिझाइन केलेली असतात. लोक येथे काही तासांसाठी किंवा रात्रभरासाठी खोली बुक करू शकत होते. १९८० आणि १९९० च्या दशकात हे हॉटेल्स खूप लोकप्रिय होते. पण कालांतराने त्यांची लोकप्रियता कमी होत गेली.
२९ वर्षीय अर्बन एक्सप्लोरर ल्यूक ब्रॅडबर्न (Luke Bradburn) हे इंग्लंडमधील ग्रेटर मॅनचेस्टरचे रहिवासी आहेत. ते २०२४ च्या सुरुवातीला जपानला गेले होते, जिथे त्यांनी आधी फुकुशिमा एक्सक्लूजन झोनची डॉक्युमेंट्री बनवली. त्यानंतर त्यांनी आइची प्रीफेक्चर (Aichi Prefecture) मधील ग्रामीण भागात नागोया (Nagoya) जवळ हे हॉटेल शोधून काढलं. हे हॉटेल चार मजली इमारत आहे, जे २००० च्या सुरुवातीच्या दशकात बंद करण्यात आलं होतं. यामागचं कारण होतं त्या भागातील लोकसंख्येत घट आणि तरुणांचा अभाव. येथे येणाऱ्या पाहुण्यांची संख्या सातत्याने कमी होत गेली आणि शेवटी हॉटेल बंद करावं लागलं.
आत कसं दृश्य होतं?
ल्यूक यांनी सांगितले की “हॉटेलात पाऊल ठेवताच असं वाटलं की जणू काळ थांबला आहे. सर्व काही अगदी तसंच होतं जसं दोन दशकांपूर्वी सोडलं गेलं असेल. भिंतींवर मेन्यूदेखील लटकलेले होते.” या हॉटेलात सुमारे ३० खोल्या असल्याचं सांगितलं जातं आणि प्रत्येक खोलीची थीम वेगळी होती.
ल्यूकला या हॉटेलबद्दल प्रथम सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमधून माहिती मिळाली, पण त्याची लोकेशन शोधणं खूप कठीण होतं कारण ते दूरच्या ग्रामीण भागात होतं. त्यांनी गूगल मॅप्सवर बराच वेळ त्या भागाचा शोध घेतला आणि मग जाऊन हॉटेलचा पत्ता शोधून काढला.
