‘फेअर अँड लव्हली खाती हूँ’ म्हणत यूट्यूबरने चक्क क्रीम खाल्ली, व्हिडीओ बघून पोट धरुन हसाल

| Updated on: Dec 21, 2020 | 4:00 PM

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे (Fair and lovely khati hoon song remake video viral).

फेअर अँड लव्हली खाती हूँ म्हणत यूट्यूबरने चक्क क्रीम खाल्ली, व्हिडीओ बघून पोट धरुन हसाल
Follow us on

मुंबई : बऱ्याचदा काही लोक बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्याचा रिमेक व्हिडीओ बनवतात. अशाचप्रकारचा एक रिमेक व्हिडीओ फेसबुकवर सध्या प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सुरु असलेल्या गाण्यासोबत डान्स करणाऱ्या टीमची वेशभूषा लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडत आहे. यूट्यूब आणि फेसबुकवर आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ बघितला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे (Fair and lovely khati hoon song remake video viral).

यूट्यूबर आदर्श आनंद याने आपल्या बच्चे पार्टीसोबत ‘फेअर अँड लव्हली खाती हूँ’ या भोजपूरी गाण्याचा रिमेक डान्स व्हिडीओ बनवला आहे. हे गाणं भोजपूरी गायिका अंतरा सिंह प्रियांका हीने गायलं आहे. मात्र, यूट्यूबर आदर्श आनंदचा रिमेक व्हिडीओ प्रचंड विनोदी आहे. या गाण्यात त्याने अंतराला रिप्लेस करुन स्वत: गुलाबी रंगाचा सूट घालून डान्स केला आहे.

या व्हिडीओत आदर्श दाडी-मिशी असलेल्या चेहऱ्यावर फेअर अँड लव्हली क्रीम लावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आदर्श क्रीमला ताटात काढून खाताना देखील दिसत आहे. त्यानंतर तो चेहऱ्यावर ती क्रीम लावत नाचताना दिसत आहे. व्हिडीओतील लहान मुलीदेखील डान्सद्वारे लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत.

आदर्श आनंदने या व्हिडीओला आपल्या फेसबूक पेजवर 19 डसेंबर रोजी शेअर केला होता. व्हिडीसोबत त्याने गाण्याची मुख्य गायिकेचं नाव लिहिलं होतं. या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर 33 हजार लोकांनी व्हिडीओला लाईकही केलं आहे. कमेंटमध्ये लोक आदर्श आणि त्याच्या टीमचं कौतुक करत आहेत. आदर्शला लोक ओरिजनल गाण्यापेक्षा जास्त विनोदी गाणं बनवल्याद्दल शुभेच्छा देखील देत आहेत.

याआधी आदर्शने ‘अंटी नंबर 1’ गाण्यावर व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओदेखील लोकांना प्रचंड आवडला होतो. आदर्शला भरपूर फोलोअर्स आहेत. त्याला यूट्यूबवर 8 लाख पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे (Fair and lovely khati hoon song remake video viral).

हेही वाचा : सांगली ते डोंबिवली, अपघात, चोरीचा थरार, सीसीटीव्हीत कैद